शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या दोघा सदस्यांचे राजीनामे

By admin | Updated: March 3, 2015 00:32 IST

सेना-मनसेत घोळ सुरूच : हालचालींना वेग

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवर आठ सदस्यांची नव्याने निवड झाल्यानंतर सभापतिपदासाठी हालचालींना वेग आला असतानाच सेना, मनसे आणि अपक्ष गटाकडून पक्षपातळीवर आपल्या सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्या सदस्यांना संधी देण्याच्या दृष्टीने दिवसभरात झालेल्या घडामोडीत अपक्ष गटाचे पवन पवार आणि रिपाइंचे सुनील वाघ यांनी स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला आहे. सत्ताधारी मनसेचा एक आणि सेनेचे दोन सदस्य राजीनामा न देण्यावर ठाम असल्याने आणि त्यातच महापौरांनी प्रत्यक्ष सदस्यानेच राजीनामा दिल्यानंतरच तो स्वीकारण्याचे स्पष्ट केल्याने सेना-मनसेत रात्री उशिरापर्यंत राजीनामा प्रकरणावरून खल सुरू होता. महापालिकेच्या स्थायी समितीवर प्रत्येक वर्षी नवीन लोकांना संधी मिळावी, यासाठी पक्षपातळीवर शिवसेना, रिपाइं, मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्ष गटाने मागील वर्षापासून एक वर्षाचा फार्मुला वापरला होता. त्यानुसार शिवसेनेचे सचिन मराठे, वंदना बिरारी, रिपाइंचे सुनील वाघ, राष्ट्रवादीचे शोभा आवारे, राजेंद्र महाले आणि रूपाली गावंड, अपक्ष गटाचे पवन पवार आणि महापौरपदी अशोक मुर्तडक यांची निवड झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर मनसेकडून सविता काळे यांची निवड करण्यात आली होती. सदर सदस्यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड करताना पक्षाने त्यांच्याकडून राजीनामेही लिहून घेतले होते. आता सदर सदस्यांचा वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर राष्ट्रवादीने आपल्या तीन सदस्यांच्या रिक्त जागांवर छाया ठाकरे, नीलिमा आमले व शिवाजी चुंभळे यांची निवड केली.