शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण

By admin | Updated: November 12, 2014 01:53 IST

मलमपट्टीवरच सारे भागणार

नाशिक : शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्याची काही महिन्यांपूर्वी केलेली घोषणा बाजूला पडली असून, आता मलमपट्टीवरच सारे भागणार आहे. सुमारे तीस लाख रुपयांची वेगवेगळी कामे असून, त्यातील बहुतांशी कामे सुरूच झालेली नाहीत. सध्या कलावंतांच्या मागणीनुसार तळघरात रंगकाम सुरू करण्यात आले असले तरी लाइट बार, साऊंड बारसह सर्वच कामे प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकली आहेत.महाकवी कालिदास कलामंदिर ही शहरातील सर्वात महत्त्वाची सांस्कृतिक वास्तू असून, कलावंतांचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे. तथापि, कालिदासकडे प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याने तुटफूट, कधी एसी बंद, खुर्च्या तुटलेल्या असे अनेक प्रकार घडत असतात. मध्यंतरी कलावंतांनी भोजनासाठी जागा मागताना अन्य अनेक सुधारणांच्या मागण्या केल्या होत्या. त्यावेळी महापालिकेने कालिदास कलामंदिराचे लवकरच नूतनीकरण करू असे जाहीर केले होते; परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. पालिकेने नूतनीकरणाची ठोस कामे करण्यापेक्षा तुकड्या तुकड्याने कामांची विभागणी करून कालिदासची मलमपट्टी सुरू केली आहे. तळघरात कलावंतांना भोजनासाठी जागा हवी होती, ती देण्यासाठी रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथील भंगार मात्र अद्याप हटविण्यात आलेले नाही. त्यासाठी महापालिकेने कोटेशन मागविले असून, ते अद्याप निविदाप्रक्रियेत आहे. खुर्र्च्यांची दुरुस्ती, मेकअप रूमची दुरुस्ती ही सर्व कामे प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत अडकली आहेत.कालिदासचे स्टेज जुने झाले असून, त्याचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. तथापि, तूर्तास लाइट आणि साऊंड बार हा स्वयंचलित पद्धतीने वर-खाली करता यावा हे तांत्रिक काम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. सदरच्या कामाला काहीसा विलंब लागणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)