देशमाने परिसरातील पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:51 IST2018-08-16T21:50:42+5:302018-08-16T21:51:20+5:30

देशमाने  गाव व परिसरात आश्लेषा नक्षत्राच्या संततधार पावसाने शेवटच्या दिवशी हजेरी लावल्याने अर्धमेल्या खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Remedies to crops in the countryside | देशमाने परिसरातील पिकांना दिलासा

देशमाने परिसरातील पिकांना दिलासा

दिड महिन्यापूर्वी परिसरात आर्द्रा नक्षत्राच्या अल्पशा पावसावर बाजरी, सोयाबीन, मका आदी खरीप पिकांची पेरणी झाली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने ही पिके सुकू लागली होती. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. तर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली आहे. ५० टक्के उत्पादनात आजच घट झाली आहे. मात्र सुकू लागलेल्या मका अन् बाजरीच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळणार असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकरºयांत समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून संततधार पावसास सुरु वात झाली. अधून- मधून पावसाचा जोर वाढत होता. पिकांना जीवदान मिळाले असले तरी विहिरी अद्याप कोरड्याच असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Web Title: Remedies to crops in the countryside

टॅग्स :agricultureशेती