शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

शाळा दुरुस्तीच्या निधीवरून पुन्हा वादंग

By admin | Updated: December 19, 2014 23:45 IST

स्थायी समिती सभा : सदस्य आक्रमक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेसमधून ७५ लाख शाळा दुरुस्तीसाठीचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी वर्ग केल्याच्या कारणावरून आणि वर्ग केलेली फाईल सापडत नसल्याच्या कारणावरून स्थायी समितीच्या सभेत सदस्यांची खडाजंगी झाली. अखेर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी हस्तक्षेप करीत या निधीतून सर्व सदस्यांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर चर्चेवर पडदा पडला.स्थायी समितीची तहकूब सभा रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी १३व्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी जिल्हा परिषदेला २० आॅक्टोबर रोजी १ कोटी ४३ लाख नऊ हजार, तर ३ डिसेंबर २०१४ रोजी १ कोटी ४३ लाख १५ हजारांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती देत हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावयाचा असल्याबाबत सांगितले. प्रा. अनिल पाटील यांनी शाळा दुरुस्तीचा निधी रस्ते दुरुस्तीवर वर्ग केल्याबाबतची फाईल कोठे आहे? याची विचारणा केली. शिक्षणाधिकारी रहिम मोगल यांनी यासंदर्भातील फाईल अर्थ विभागाकडून प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट केले, तर राजेंद्र महाले यांनी शाळा दुरुस्तीचा निधी रस्ते दुरुस्तीवर वर्ग करण्याबाबतचा निर्णय २० जुलैच्या सभेत झाल्याचे स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादीचे गटनेते रवींद्र देवरे यांनी बांधकाम व अर्थ विभागाकडे फाईल नाही, तर ही फाईल गेली कुठे. फाईल कुठे हे सांगता येत नसेल तर पुढील चर्चा थांबवा, असे स्पष्ट केले. सभापती केदा अहेर यांनी लेखा अधिकाऱ्यांनी यावर उत्तर द्यावे, अशी सूचना केली. रवींद्र देवरे यांनी शाळा दुरुस्तीचा निधी रस्ते दुरुस्तीवर वर्ग करण्याबाबत ठराव झालेले नाही. तसेच शाळा दुरुस्तीच्या ७५ लाखांच्या कामांची व सौरऊर्जेच्या ८० लाखांच्या कामांची यादी सादर करण्याची मागणी देवरे यांनी केली. गोरख बोडके यांनी ७३ सदस्यांच्या गटात यापैकी किती निधी वाटप झाला याची माहिती देण्याची मागणी केली. त्यावर केदा अहेर यांनी या कामांचे कार्यारंभ आदेश थांबविण्यात आल्याबाबत माहिती दिली. प्रवीण जाधव यांनी स्थायी समितीला अशी कामे रोखण्याचा अधिकार आहे काय? असे विचारताच रवींद्र देवरे यांनी स्थायी समितीत असा ठराव झालेला आहे. त्यानुसार कार्यवाही न झाल्यास आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला. विजयश्री चुंबळे यांनी याप्रकरणी सर्वांना न्याय मिळेल, असे सांगत विषयावर पडदा टाकला. मुद्रांक कराआधी थकबाकी जमा करावीग्रामपंचायत व त्यांच्या क्षेत्रातील विविध वेअर हॉऊस कंपन्या व अन्य व्यावसायिक कंपन्या यांच्यात करार होत नसल्याने त्यांच्याकडील थकबाकी वाढत असून, यापुढे ग्रामपंचायतीसोबत संबंधित कंपन्यांचा ठोक करार करण्याआधीच त्यांच्याकडील मागील थकबाकीपैकी किमान ५० टक्के थकबाकी आधी वसूल करावी, मगच करार करण्यात यावा, अशी मागणी गटनेते प्रवीण जाधव यांनी केली. प्रकाश वडजे यांनी नियमात असेल त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांना दिले. प्रा. अनिल पाटील यांनी बैठकीच्या आधी आवश्यक ती कागदपत्रे मिळावीत,अशी सूचना केली. रणधीर सोमवंशी यांनी मुद्रांक शुल्कापोटी ग्रामपंचायतींना अदा करावयाच्या रकमेतून ५ टक्के निधी जिल्हा परिषदेला मिळतो. तो यावर्षी साडेतीन कोटी रुपये मिळाला असून, त्या निधीची काही वर्षांसाठी ठेव ठेवण्यासाठी परवानगी मिळण्याचा विषय ठेवला, त्यास बैठकीत मंजूर करण्यात आली. (प्रतिनिधी)