शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीबाबत खल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:03 IST

नाशिक : लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात आला असल्याने आता प्रशासक नियुक्त करण्यात येणार असून, त्यासाठी महाविकास आघाडीने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.

नाशिक : लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात आला असल्याने आता प्रशासक नियुक्त करण्यात येणार असून, त्यासाठी महाविकास आघाडीने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि.११) शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन राजकीय खल केला. प्रशासक नियुक्तीसाठी आता ग्रामपातळीवरून नावे मागवण्यात येणार असून, अंतिम निवडीचे सर्वाधिकार पालकमंत्री भुजबळ यांना देण्यात आले आहेत.कोरोना संसर्गामुळे राज्यातील बहुतांशी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडचणीत आल्या आहेत. नाशिकसह राज्यातील हजारो ग्रामंपचायतींच्या निवडणुकादेखील अशाच प्रकारे अडचणीत आल्यानंतर आता शासनाने मुदत संपलेल्या ग्रामंपचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, याची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आलेली नाही. नाशिक जिल्ह्यात पाचशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्याने त्यावरदेखील प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भात शनिवारी झालेल्या बैठकीप्रसंगी (दि. ११) पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामपंचायतीसाठी प्रशासक नियुक्त करण्याबाबत ठोस कार्यपद्धती ठरवून दिली नसल्याने ग्रामपातळीवरून यासंदर्भात नावे मागवून ती तालुका अध्यक्षांकडेद्यावीत. त्यांनी आपसात बसवून गावातील नावांची निश्चिती करावी, त्यांच्यात एकमत न झाल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार एकत्र बैठक घेतील. त्यातही एकमत न झाल्यास अखेरीस पालकमंत्री घेतील तो निर्णय मान्य करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने ग्रामपंचायतीवरील वरचष्मा कायम ठेवण्यासाठी कंबर कसलीआहे.---------------------भुजबळ यांना अंतिम अधिकारसाधारणत: ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रशासक म्हणजे कारभारी नियुक्त करण्याचे ठरविण्यात आले असले तरी त्या गावात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी यांच्यापैकी कोणत्या पक्षाचे प्राबल्य आहे, त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच राजकीय मतभेद शक्य असल्यानेच अंतिम अधिकार पालकमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक