लाल कांदा केवळ ८०० रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:34+5:302021-04-18T04:14:34+5:30

चौकट - यावर्षी केवळ ३० टक्के कांदा चाळीमध्ये साठविला जाऊ शकतो असा तज्ज्ञांना अंदाज आहे. यामुळे भविष्यात भाव वाढण्याची ...

Red onion only Rs. 800 per quintal | लाल कांदा केवळ ८०० रुपये क्विंटल

लाल कांदा केवळ ८०० रुपये क्विंटल

googlenewsNext

चौकट -

यावर्षी केवळ ३० टक्के कांदा चाळीमध्ये साठविला जाऊ शकतो असा तज्ज्ञांना अंदाज आहे. यामुळे भविष्यात भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी विचारपूर्वक कांदा विक्री करावी, असा सल्लाही कृषितज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सध्या कांद्याचे भाव कमी असल्याने काही भांडवलदार सध्या बांधावर कांदा खरेदी करीत आहेत याबाबत शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही केले जात आहे.

चौकट-

कोरोनाबाबत उपाययोजना

बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काही बाजार समित्यांनी उपाययोजना सुरू केल्या असून, एका वाहनाबरोबर एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये, असे आवाहनही केले जात आहे. शेतकऱ्यांनी घरूनच डबा आणावा अशा सूचना बाजार समित्यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत .

Web Title: Red onion only Rs. 800 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.