कोंथिबिरीला विक्रमी भाव

By Admin | Updated: October 11, 2016 01:19 IST2016-10-11T01:19:13+5:302016-10-11T01:19:29+5:30

कोंथिबिरीला विक्रमी भाव

Recordings in Konthi Biri | कोंथिबिरीला विक्रमी भाव

कोंथिबिरीला विक्रमी भाव

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मातीमोल भाव मिळणाऱ्या कोंथिबिरीच्या जुडीला सात रुपये तर शेकडा साडेआठ हजार इतका विक्रमी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली. रविवारी (दि.९) दिवसभर शहरासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण असताना शेतकरी वर्गातून शेतमाल बाजार समितीत आणण्याबाबत चिंतेचे वातावरण होते. मात्र सोमवारी (दि.१०) बाजार समितीचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू झाले. दिवसभरात कोंथिबिरीच्या सुमारे तीन लाख जुड्यांची आवक बाजार समितीत झाल्याचे देवीदास पिंगळे यांनी सांगितले. कोंथिबिरीला जुडीमागे सात रुपयांचा तर शेकड्याला साडेआठ हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. टमाट्याच्या २० किलोच्या जाळीला कमीत कमी २५० तर जास्तीत जास्त ३५० रुपयांचा भाव मिळाला.

Web Title: Recordings in Konthi Biri