लाल कांद्याची विक्रमी आवक

By Admin | Updated: January 8, 2017 00:34 IST2017-01-08T00:34:34+5:302017-01-08T00:34:47+5:30

लासलगाव : घसरण सुरूच असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी

Recordable onion of red onion | लाल कांद्याची विक्रमी आवक

लाल कांद्याची विक्रमी आवक

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. लिलावाला सुरुवात होताच कांद्याच्या दरात घसरण झाल्याने उत्पादकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
कांद्याला किमान २१०, कमाल ७७१ रुपये तर सरासरी ६७५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शनिवार व रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने बाजार समितीत लाल कांद्याची पुन्हा एकदा विक्रमी आवक पहावयास मिळाली. दोन दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने लासलगाव बाजार समितीत तब्बल ३३ हजार ९२० क्विंटल लाल कांदा विक्र ीसाठी आला होता. या विक्रमी आवकेमुळे बाजार आवार शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकांना मोठी आर्थिक चिंता सतावते आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Web Title: Recordable onion of red onion