शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे यांच्या अभिवादन सभेकडे आमदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:46 IST

नाशिक : माजी केंद्रीयमंत्री व भाजपाचे राष्टÑीय महासचिव दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेकडे देशात क्रमांक एकचा पक्ष म्हणवून घेणाºया भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच तिन्ही आमदार व खासदारांनी पाठ फिरविल्याची बाब मुंडे यांना मानणाºया गटाच्या जिव्हारी लागली आहे. मते मागण्यासाठी मुंडे यांच्या नावाचा वापर करणाºयांना आता का त्यांची आठवण आली नाही? असा सवालही केला जात आहे.

ठळक मुद्देमुंडे गट नाराज मोजक्याच पदाधिकाऱ्यांची हजेरी

नाशिक : माजी केंद्रीयमंत्री व भाजपाचे राष्टÑीय महासचिव दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेकडे देशात क्रमांक एकचा पक्ष म्हणवून घेणाºया भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच तिन्ही आमदार व खासदारांनी पाठ फिरविल्याची बाब मुंडे यांना मानणाºया गटाच्या जिव्हारी लागली आहे. मते मागण्यासाठी मुंडे यांच्या नावाचा वापर करणाºयांना आता का त्यांची आठवण आली नाही? असा सवालही केला जात आहे.गोपीनाथ मुंडे यांचा नाशिकशी नेहमीच जवळचा संबंध राहिला होता. भाजपातील ओबीसी समाजाला मुंडे हे आपले नेते वाटत असल्याने व स्वत: मुंडे यांनीही राजकीय कारकिर्दीतील ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली होती. नाशिक शहर भाजपात मुंडे यांना मानणारा स्वतंत्र गट अद्यापही अस्तित्वात असून, मुंडे यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक पेरणीतूनच भाजपाला नाशिक जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. शहरात तीन आमदार व एक खासदार कार्यरत असून, महापालिकेत ६६ नगरसेवक आहेत. असे असताना रविवारी सकाळी ११ वाजता शहर भाजपाच्या वतीने पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कार्यक्रमाला भाजपा शहर कार्यकारिणीतील सरचिटणीस उत्तमराव उगले, अरुण शेंदुर्णीकर याप्रमुख पदाधिकारी व पश्चिम मंडळाचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे मोहिने भगरे वगळता सर्वांनीच पाठ फिरविली. प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार, खासदार येतील अशी आशा बाळगून जवळपास एकतास वाट पाहण्यात आली. ज्यांनी ११ वाजता कार्यालयात हजेरी लावली, त्यांनी वाट पाहून बाहेरचा रस्ता धरला. अखेर सरचिटणीस उगले यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उगले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत, मुंडे यांच्या मार्गाने प्रत्येक कार्यकर्त्याने वाटचाल केल्यास हमखास यश प्राप्ती होईल, असे सांगितले. कार्यक्रमास उदय रत्नपारखी, अमित घुगे, नंदकुमार देसाई, विजय पाटील, राम बडोदे, मनोज देवरे, सोमनाथ बोडके, सोनल दराडे, विजय बनसोडे, प्रदीप पाटील, नीलेश महाजन आदी उपस्थित होते. भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे मुंडे गट नाराज झाला असून, त्याची जोरदार चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत होऊ लागली आहे.शहरात असूनही आमदार गायबस्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकडे पाठ फिरविणारे भाजपाचे तिन्ही आमदार नाशकातच तळ ठोकून असल्याचे उघड झाले आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेने सकाळी आयोजित केलेल्या अभिवादन सभेत स्व. मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, परंतु पक्ष कार्यालयातील कार्यक्रमाला गैरहजेरी लावली.४पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, मात्र ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपण हजेरी लावली असे सांगितले, परंतु पक्ष कार्यालयातील कार्यक्रमास लोकमत प्रतिनिधींना ते दिसले नाहीत. आमदार सीमा हिरे यादेखील नाशकातच होत्या, परंतु पक्ष कार्यालयात कार्यक्रमाची आपल्याला माहिती नाही, सरचिटणीसांना विचारून सांगते असे सांगून त्यांनी अनभिज्ञता दर्र्शविली व सामाजिक पेरणीतूनच भाजपाला नाशिक जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ आले आहेत. शहरात तीन आमदार व एक खासदार कार्यरत असून, महापालिकेत ६६ नगरसेवक आहेत. असे असताना रविवारी सकाळी ११ वाजता शहर भाजपाच्या वतीने पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कार्यक्रमाला भाजपा शहर कार्यकारिणीतील सरचिटणीस उत्तमराव उगले, अरुण शेंदुर्णीकर याप्रमुख पदाधिकारी व पश्चिम मंडळाचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे मोहिने भगरे वगळता सर्वांनीच पाठ फिरविली. प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार, खासदार येतील अशी आशा बाळगून जवळपास एकतास वाट पाहण्यात आली. ज्यांनी ११ वाजता कार्यालयात हजेरी लावली, त्यांनी वाट पाहून बाहेरचा रस्ता धरला. अखेर सरचिटणीस उगले यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उगले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत, मुंडे यांच्या मार्गाने प्रत्येक कार्यकर्त्याने वाटचाल केल्यास हमखास यश प्राप्ती होईल, असे सांगितले. कार्यक्रमास उदय रत्नपारखी, अमित घुगे, नंदकुमार देसाई, विजय पाटील, राम बडोदे, मनोज देवरे, सोमनाथ बोडके, सोनल दराडे, विजय बनसोडे, प्रदीप पाटील, नीलेश महाजन आदी उपस्थित होते. भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे मुंडे गट नाराज झाला असून, त्याची जोरदार चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत होऊ लागली आहे.