शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्ड, शासकीय दाखले देणारा अड्डा उद्ध्वस्त

By admin | Updated: April 11, 2017 01:09 IST

नाशिक : विविध बनावट शासकीय दाखले देणाऱ्या पंचवटीतील एका दुकानावर सोमवारी शहर धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अचानक छापा मारला असता, मोठे घबाड हाती लागले.

पुरवठा खात्याची कारवाई : अनेक बनावट दस्तावेज जप्तनाशिक : रेशन कार्डासहीत राष्ट्रीयत्व, वय व अधिवास, जन्म-मृत्यूची नोंदणी यांसह विविध बनावट शासकीय दाखले देणाऱ्या पंचवटीतील एका दुकानावर सोमवारी शहर धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अचानक छापा मारला असता, मोठे घबाड हाती लागले. अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे दाखले तसेच शहर व जिल्ह्यातील शाळा सोडल्याचे कोरे दाखलेही या ठिकाणी सापडले आहेत. पंचवटी महाविद्यालयानजिकच्या श्री जी लॉजिंग जवळील एका सेतू केंद्राच्या बाजूला असलेल्या अग्रवाल असोसिएट्स नामक दुकानात रेशन कार्ड तयार करून मिळत असल्याची कुणकुण धान्य वितरण अधिकारी गणेश राठोड यांना लागली होती.  त्यानुसार सोमवारी दुपारी पुरवठा निरीक्षक डेबे, नायब तहसीलदार शेवाळे आदिंच्या पथकाने या दुकानावर अचानक छापा मारला असता, याठिकाणी अनेक महत्त्वाचे दस्तावेज आढळून आले. सदरचे दुकान प्रमोद नार्वेकर याचे असल्याचे व त्याच्याकडे एजंट म्हणून हरिश्चंद्र रामचंद्र अग्रवाल काम करीत होता. हे दोघेही रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, शिधापत्रिकेतून नाव वगळणे आदि प्रकारचे बनावट दाखले तयार करीत होते. या ठिकाणी जवळपास शंभर रेशन कार्ड सापडले असून, काही रेशनकार्ड तयार करण्यात आल्याचे व त्यावर महसूल खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांची बनावट सही, शिक्क्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जातीचे दहा दाखले, नाशिक महापालिकेकडून देण्यात येणारे जन्म-मृत्यूचे दाखले, नाशिक शहरातील के. जे. मेहता, कोठारी कन्या, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, जनता विद्यालय, गांधीनगर, जु. स. रुंग्टा, चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शाळा सोडल्याचे कोरे दाखलेही सापडले आहेत. विविध रकमेचे कोरे स्टॅम्प पेपरही याठिकाणी सापडल्याने झडती सत्र आटोपल्यानंतर पथकाने सर्व दाखले व साहित्य ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरा हरिश्चंद्र अग्रवाल व प्रमोद नार्वेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)गुन्ह्याची राज्यव्यापी व्याप्तीया धाडसत्रात ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील तहसीलदारांचे रेशन कार्डावरील नाव कमी केल्याचे दाखले तसेच शिधावाटप नियंत्रण समितीच्या ठाणे व मुंबई येथील कार्यालयाचेही नाव कमी केल्याचे दाखले हाती लागल्याने राज्यातील अन्यत्र भागातीलही बनावट दाखले या ठिकाणाहून दिले जात असल्याचा संशय आहे. शिवाय सापडलेले अनेक रेशन कार्डचीदेखील बनावट छपाई करण्यात आली असून, त्याची खात्री करण्यासाठी रेशन कार्डावरील क्रमांक तपासून पाहण्यात आले आहेत.