शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

सरसकटऐवजी गरज ओळखून करावी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:26 IST

सांगळे : पालकमंत्र्यांना घालणार साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे विकासकामांना सरसकट ३० ते ५० टक्के कपातीचा निर्णय आता विकासकामांच्या मुळावर उठणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाने सरसकट ३० टक्के कपात करण्याऐवजी आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागांच्या गरजा ओळखून ही कपात १५ ते २० टक्के करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी केली आहे.बुधवारी (दि.१९) यासंदर्भात होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांना याबाबत पत्र देऊन मागणी करणार असल्याचेही शीतल सांगळे यांनी सांगितले.जिल्ह्यात उघड्यावर भरणाऱ्या बिगर आदिवासी भागातील अंगणवाड्यांसाठी यापुढे एक रुपयाचाही निधी मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यातच प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक शाळा यांच्यासाठी नियोजित निधीला थेट ३० टक्के कपात करण्याचा निर्णय आरोग्य व शिक्षणाविषयक पायाभूत सुविधांपासून जनतेला परावृत्त करणारा आहे. शिक्षण व आरोग्यविषयक कामांसाठी सरसकट ३० टक्के कपात करण्याऐवजी गरज ओळखून १५ ते २० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केली आहे. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटून त्यासंदर्भात मागणीचे निवेदन देणार असल्याचे सांगळे यांचे म्हणणे आहे. या सरसकट ३० टक्के निधी कपातीच्या निर्णयाने विकासकामांवर मोठा विपरीत परिणाम होणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेच्या बिगर आदिवासी भागातील काही अंगणवाड्या उघड्यावर, चावडीवर किंवा पारावर भरतात. त्यांना एकीकडे शासनाने निधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा अंगणवाड्यांच्या कामांसाठी तरी जिल्हा नियोजन समितीकडून भरीव स्वरूपात निधी मिळणे अपेक्षित असल्याचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.विभाजनाचे प्रस्ताव पाठवाच्आदिवासी व बिगर आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या विभाजनाचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समित्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेकडे पाठवावेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी या प्रस्तावांना शासन स्तरावरून तत्काळ मान्यता देण्याची ग्वाही दिल्याचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले. विभाजन करावयाच्या ग्रामपंचायतींमध्ये तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नसावे आणि लोकसंख्येचे निकष पाळणाऱ्या ग्रामपंचायतींचे तत्काळ विभाजन करण्यात येणार आहे. आदिवासी भागासाठी १ हजार तर बिगर आदिवासी भागासाठी दोन हजार लोकसंख्येचा निकष आहे.