नवरात्रोत्सवासाठी मंदिरांना रंगरंगोटी

By Admin | Updated: September 29, 2016 00:07 IST2016-09-29T00:07:31+5:302016-09-29T00:07:58+5:30

नवरात्रोत्सवासाठी मंदिरांना रंगरंगोटी

Rangarangoti temple for Navratri festival | नवरात्रोत्सवासाठी मंदिरांना रंगरंगोटी

नवरात्रोत्सवासाठी मंदिरांना रंगरंगोटी

पंचवटी : अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरासह परिसरातील अन्य देवी मंदिरांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
येत्या शनिवारी घटस्थापना असल्याने नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच माळेपासून भाविकांची गर्दी होणार असल्याने नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी तयारी सुरू केली आहे. गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरात नवरात्र उत्सवात भाविक गर्दी करतात. सध्या मंदिराला रंगरंगोटी करण्यापाठोपाठ गोदावरीला आलेल्या पुरामुळे मंदिराचे काही नुकसान झाल्याने डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सांडव्यावरची देवी मंदिरापाठोपाठ परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त मित्रमंडळांनी देवी मंदिराला रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेतले आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Rangarangoti temple for Navratri festival