शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रामकुंडावर स्नानासाठी भाविकांचा ओघ सुरूच

By admin | Updated: September 26, 2015 23:07 IST

साधली पर्वणी : मंदिरांमध्येही झाली गर्दी

नाशिक : त्र्यंबकला शुक्रवारी तिसऱ्या शाहीस्नानंतर शनिवारी रामकुंडावर स्नानासाठी भाविकांचा ओघ कायम दिसून आला. परराज्यातून त्र्यंबकला शाहीस्नानासाठी आलेल्या भाविकांनी रामकुंडावर स्नानासाठी गर्दी केली होती. त्र्यंबकच्या कुशावर्त तीर्थावर स्नान केल्यानंतर भाविकांनी रामकुंडावर स्नान करून परतीचा मार्ग धरला. रामकुंड परिसरात परराज्यातील भाविकांनी परिसरातील काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर याठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दिसून आले. त्र्यंबककडून परतणाऱ्या भाविकांना रामकुंडात स्नानाला प्राधान्य दिल्याने दोन दिवसांपासून रामकुंडावर भाविकांचा स्नान करण्याकडे कल वाढला आहे. रामकुंडापर्यंत वाहने जात असल्याने परराज्यातून येणाऱ्या भाविकांना निवांतपणे स्नान करता येत आहे. त्यामुळे विविध राज्यांतून येणाऱ्या भाविकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. रामकुंड परिसरात पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे. नाशिकला तिसरी शाही पर्वणी १८ सप्टेंबरला पार पडली. पाऊस व पर्वणीच्या कालावधीत येऊ न शकलेले भाविक सध्या स्नानाचा लाभ घेत आहे. त्र्यंबकच्या शाही पर्वणीनंतर भाविक शहरात दाखल होत आहेत. शहरात मेळा स्थानकात दाखल झाल्यानंतर भाविक रामकुंडाकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे मेळा स्थानकावरून त्र्यंबकवरून परतणारे भाविक रिक्षा, शहर सेवेतील बसेसद्वारे गंगाघाटावर येत आहेत. दिवसभर भाविकांची रामघाटावर रेलचेल पहायला मिळाली. दरम्यान, सीतागुंफा पाहण्यासाठीही सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. तसेच तपोवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. त्यामुळे या रस्त्यावर काही प्रमाणात ट्राफिक जॅमचा प्रत्यय नाशिककरांना आला. (प्रतिनिधी)