जानोरी येथील रामदेवजी बाबा मंदिरात दशमी उत्सव

By Admin | Updated: September 10, 2016 00:34 IST2016-09-10T00:33:50+5:302016-09-10T00:34:03+5:30

जानोरी येथील रामदेवजी बाबा मंदिरात दशमी उत्सव

Ramdevji Baba temple at Dnyami festival in Janori | जानोरी येथील रामदेवजी बाबा मंदिरात दशमी उत्सव

जानोरी येथील रामदेवजी बाबा मंदिरात दशमी उत्सव

ओझर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जानोरी येथील रामदेवजी बाबा मंदिर येथे दरवर्षी साजरा होणारा वार्षिक दशमी उत्सव यंदा सोमवारी दि. १२ रोजी साजरा होत आहे.
सकाळी १० वाजता ध्वजारोहण, ११ वाजता महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो भाविक येथे दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गर्दी करतात. येथील डाळबट्टीचा महाप्रसाद प्रसिद्ध आहे. पौराणिक आणि पुरातन मंदिरांमध्ये जानोरी येथील मंदिराचा समावेश होतो. सर्व धर्मांचे भाविक या उत्सवात सहभागी होतात. भाविकांनी या उत्सवात हजेरी लावावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Ramdevji Baba temple at Dnyami festival in Janori