शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष

By admin | Updated: March 26, 2015 00:51 IST

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष

चांदवड : तीस लाख रुपये दिल्यास त्या बदल्यात पैशांचा पाऊस पाडून दोन कोटी रुपये करून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार चांदवड येथे उघडकीस आला; मात्र या प्रकरणी भोंदूबाबाच्या अपहरणाचा गुन्हा वडनेरभैरव पोलिसांत दाखल झाला आहे. अटकेतील महिलेची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून, आता चांदवड पोलीस या प्रकरणी महिलेची चौकशी करत आहेत. दरम्यान, सदर भोंदूबाबा फरार असून, या प्रकरणी अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे चांदवड तहसीलदार कार्यालयासमोरच असलेल्या एका घरात तीन महिन्यांपासून सदर प्रकार सुरू असूनही कुणाच्या लक्षात कसे आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चांदवड येथे एका घरात पैशांचा पाऊस पाडतो, अशा प्रकारचे आमिष दाखवण्यात येत होते. संतोष सौदे याच्या घरात गेल्या तीन महिन्यांपासून आंनदगिरी ऊर्फ राजेंद्र पगारे रा. वडाळीभोई व त्यांचे साथीदार एका महिलेसह जादूटोणाच्या सहाय्याने हा ‘उद्योग’ करीत असत. प्रकरणाला वाचा फुटली ! नंदुरबार येथील एका महिलेशी काहींनी संपर्क साधून ३० लाख रुपये द्या, तुम्हाला दोन कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखविले. बाबाकडून पैसे न मिळाल्याने या महिलेने पैशांची मागणी केली; मात्र नकार मिळाल्यानंतर तथाकथित बाबाला घेऊन सदर महिला व तिचे साथीदार तवेरा गाडीने धुळ्याकडे जात असताना पगारे याने त्यांची पत्नी विद्या यांना फोन करून पोलिसांत अपहरणाची फिर्याद देण्यास सांगितले. त्याप्रमाणे विद्या पगारे हिने मुन्ना ऊर्फ समीर पानसरे व त्यांच्या साथीदारांविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. इमले यांनी पाठलाग करून त्यांना धुळे येथील टोलनाक्यावर महिलेसह राजेंद्र पगारे यांना पकडले. सदर महिलेने पोलिसांना या बाबाने पैसे घेतल्याचे सांगीतले; मात्र त्याचवेळी रकमेबाबत निश्चित माहिती दिली नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला. पैशावरून पगारे व आमच्यात वाद झाल्याने आम्ही त्यास पळवून नेत असल्याचे सांगितल्यानंतर वडनेरभैरव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून महिलेस अटक केली. (वार्ताहर)