शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभर पाऊस

By admin | Updated: July 15, 2017 01:20 IST

नाशिक : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने नांदगाववगळता जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने नांदगाववगळता जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून, धरणसाठ्यातही कमालीची वाढ झाल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी दारणा व नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर सुरगाणा तालुक्यात पावसामुळे पाझर तलाव फुटला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी मिटली असून, गंगापूर धरणात सायंकाळपर्यंत ६२ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७५७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असली तरी, त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४८ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला आहे. विशेष करून नाशिक शहराला पहाटेपासून पावसाने झोडपून काढले. दुपारी बारा वाजेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागल्याने गोदाकाठी धार्मिक विधीसाठी आलेल्या बाहेरगावच्या नागरिकांची तारांबळ उडाली तसेच व्यावसायिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली;  दारणा नदीच्या पाण्यामुळे सिन्नर-घोटी मार्गावरील पूल कमकुवत झाल्याचे लक्षात येताच या तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच या मार्गावरील वाहतूक मुडीगावातून साकूड गोंद मार्गे वळविण्यात आली. एकीकडे अन्यत्र धुवाधार पर्जन्यवृष्टी होत असताना मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, येवला या तालुक्यांवर पावसाची वक्रदृष्टी कायम आहे.