शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By admin | Updated: July 3, 2016 22:23 IST

दिवसभर रिपरिप : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार

 सिन्नर : शहर व तालुक्यात रविवारी पहाटेपासून पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मध्यम, तर पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सिन्नर तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने व यावर्षी पाऊस लांबल्याने सर्वसामान्य जनतेसह प्रशासन हतबल झाले होते. गेल्या आठवड्यात तालुक्यातील कुंदेवाडी, खंबाळे, दोडी भागात मुसळधार पाऊस झाला होता. मात्र उर्वरित तालुका कोरडाच होता. रविवारी पहाटेपासून शहर व तालुक्यात पावसाचे सुखद आगमन झाले. ठाणगाव परिसरात पावसाचा जोर चांगला होता. सिन्नर शहरात अधून-मधून सरी कोसळत होत्या. पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात पावसाचा जोर लागला होता, तर पूर्व भागात रिमझिम तर कधी मध्यम सरी कोसळत होत्या. या पावसाने खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील बहुतांश भागात अद्याप खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या मध्यम पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने व सुमारे महिनाभर पाऊस लांबल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वांना धीर मिळाला आहे. या पावसात जोर नसला व विहिरींना पाणी उतरण्याची शक्यता नसली तरी खरिपाच्या पेरण्या होऊ शकतील अशी आशा आहे. भविष्यात पाऊस पडेल या अपेक्षेवर शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देतील. या मध्यम पावसामुळे मात्र टॅँकरचे प्रमाण घटण्याची शक्यता नाही. सलग तीन-चार दिवस पाऊस चालल्यास टंचाईची तीव्रता कमी होऊ शकते. मात्र रविवारी सकाळपासून पाऊस पडता झाल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. ओझरला पाऊसओझर टाऊनशिप : परिसरात आज सकाळी सात वाजेपासून दमदार पाऊस सुरू झाला. दुपारपर्यंत पाऊस झाला. काही दिवसांपासून वातावरण तयार होऊनही हुलकावणी देणाऱ्या पावसाने कालही दिवसभरात कमीजास्त प्रमाणात हजेरी लावली. आज झालेल्या दमदार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. दुपारनंतर काही वेळ रिमझिम, तर काही वेळ दमदार असा पाऊस सुरू होता. (वार्ताहर)