शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

कोरोनापासून बचावासाठी रेल्वेची सुरक्षाव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:16 AM

प्राणघातक कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड, देवळालीसह भुसावळ मंडळात कर्मचाऱ्यांना विविध आधुनिक सोयी-सुविधा दिल्या आहेत.

नाशिकरोड : प्राणघातक कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड, देवळालीसह भुसावळ मंडळात कर्मचाऱ्यांना विविध आधुनिक सोयी-सुविधा दिल्या आहेत.तिकीट तपासणीसांना फेसशिल्ड व काचेचे भिंग देण्यात आले आहेत, तर रिझर्व्हेशन कार्यालयात टू वे माईक सिस्टिम लावण्यात आली आहे. तसेच नोटांपासून कर्मचाºयांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अल्ट्रा वाइलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीनही देण्यात आली आहे.सध्या विशेष प्रवासी रेल्वेगाड्या सुरू आहेत. रेल्वे तिकिटाचे आरक्षण खिडकीवर टू वे माइकची सोय रेल्वेने केली आहे. प्रवासी आरक्षणासाठी केंद्रावर येत असतात. ते रांगेत असताना त्यांना तसेच आरक्षण कर्मचाºयांनाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून संवाद साधावा लागतो. त्यामुळे अडचणी येतात. ते लक्षात घेऊन रेल्वेने सर्व आरक्षण खिडक्यांवर टू वे माईक सिस्टमची सोय केली आहे. या माध्यमातून रेल्वे आरक्षण कर्मचारी प्रवाशांचे बोलणे व्यवस्थित समजून घेऊ शकतात.आरक्षण खिडक्यांवर बाहेरील बाजूस प्रवाशांचे बोलणे ऐकून घेण्यासाठी स्पिकर लावण्यात आले आहे.नोटांचा व्यवहार आरक्षण कार्यालयात जास्त प्रमाणात होत असल्यामुळे भुसावळ मंडळातील सर्व आरक्षण कार्यालयांमध्ये सुरक्षेसाठी अल्ट्रा वाइलेट सॅनिटायझेशन करन्सी नोट मशीन लावण्यात आली आहेत. आरक्षण लिपिक आणि प्रवासी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मशीन लावण्यात आली आहे. नोटांची देवाण- घेवाण करताना याचा चांगला उपयोग होणार आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोळा तिकीट तपासणीस आहेत. त्यांना फेसशिल्डही देण्यात आले आहेत. टिसींना आपले काम करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. गाडीमध्ये बसलेल्या तसेच स्थानकात आलेल्या प्रवाशांचे तिकीट जवळून तपासावे लागते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे रेल्वेने भुसावळ मंडळमधील सर्व तिकीट तपासणीच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेसशिल्ड आणि भिंग काच दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे