शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:53 IST

हरीयाणा पोलीसांनी आंतरजातीय विवाह करणा-यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या आवारात शेल्टर होम उभारले आहे. दोन वर्षे तेथे राहता येते. या दरम्यान, ज्यांच्या कुटूंबियांचा विरोध आहे त्यांना बोलवून त्यांची समजूत काढली जातेच शिवाय विवाह करणा-यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार धरू अशी अंतिम ताकीद दिली जाते.

ठळक मुद्देजोडीदाराची विवेकी निवड उपक्रम सुरू शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात

नाशिक-  बीड येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून हत्याकांड घडले. भाग्यश्री वाघमारे या मुलीच्या भावाने म्हणजेच बालाजी लांडगे याने तीच्या पतीची रोहीत वाघामारे याची हत्या केली. आॅनर किलींग किंवा आंतरजातीय विवाह केला म्हणून हत्या करण्याचे प्रकार नवे नाहीत. मात्र त्यावर पायबंद आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या जात पंचायत मूठ माती अभियानाचा विषय हाताळणारे आणि या विषयासाठी राज्यस्तरावर काम करणारे प्रदेश कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली. त्याच बरोबर अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याचा हरीयाणा पॅटर्न उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. प्रश्न: आॅनर किलींग या प्रकाराच्या विरोधात सुरू असलेली मोहिम आणि बीडची घटना याबाबत काय वाटते?चांदगुडे: आंतरजातीय विवाह केल्यानंतर उभयतांच्या कुटूंबियांपैकी कोणाचा विरोध असेल तर त्यातून होणा-या हत्याकांड किंवा सामाजिक बहिष्काराचे प्रकार नवे नाहीत. २०१३ मध्ये अशाच प्रकारे जात पंचायतीमुळे आंतरजातीय विवाह करणा-या मुलीला शिक्षा मिळाली. त्यामुळे महाराष्टÑ अंनिसने या विषयाला हात घातला. त्यामुळे जातीयवाद करणा-या जातीय पंचायतींना चाप बसला. तसेच राज्य सरकारला कायदाही करावा लागला. बीड मधील घटनेचे मुळ कारण अद्याप तपासले जात आहे.प्रश्न: अंनिसने याबाबत काय जागृती केली आहे.चांदगुडे: जात पंचायत मूठमाती अभियान अंनिसने राबविले आणि त्यानंतर सरकारला कायदा करावा लागला हे सर्वांनाच माहिती आहे परंतु त्यापलिकडे जाऊन जोडीदाराची विवेकी निवड उपक्रम सुरू केला आहे. आंतरजातीय विवाह करताना जोडीदाराची किती विवेकाने निवड झाली आहे हे आधी तपासले जाते. मगच त्यांना मदत केली जाते. सुरूवातीला तर मुला मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजावला जातो. त्यानंतर मुले परिपक्व नसतील तर त्यांची समजूतही काढली जाते. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही लाभत आहे. प्रश्न: बीड सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय करता येईल?चांदगुडे: आंतरजातीय विवाहातून होणारे जातीतील वाद आणि जात पंंचायतीने त्यावर दिलेले आदेश असे प्रकार यापूर्वी घडले होते. त्यामुळे त्यावर सरकारने कायदा केला आहे. परंतु हरीयाणामध्ये याबाबत वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. हरीयाणा पोलीसांनी आंतरजातीय विवाह करणा-यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या आवारात शेल्टर होम उभारले आहे. दोन वर्षे तेथे राहता येते. या दरम्यान, ज्यांच्या कुटूंबियांचा विरोध आहे त्यांना बोलवून त्यांची समजूत काढली जातेच शिवाय विवाह करणा-यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार धरू अशी अंतिम ताकीद दिली जाते. शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात असे मी बघितले आहे त्यामुळे महाराष्टÑात अशाप्रकारचे शेल्टर होम सुरू झाले पाहिजे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला आम्ही दिला आहे त्याच बरोबर सध्या आंतरजातीय विवाह करणा-यांना राज्य सरकार पन्नास हजार रूपये देते त्यात वाढ करून राजस्थान सरकारप्रमाणेच दोन लाख रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची देखील मागणी केली आहे तूर्तास हरीयाणाच्या धर्तीवर शेल्टर होम उभारण्याच्या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत.मुलाखत: संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक