शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमानांना धक्का; इच्छुकांना झटका

By admin | Updated: October 8, 2016 01:16 IST

नाशिकरोड : पक्षांतर्गत चढाओढ; काही माजी नगरसेवकांना संधी

मनोज मालपाणी  नाशिकरोड
मनपा प्रभागाच्या नवीन आरक्षण सोडतीनुसार नाशिकरोड विभागात सहा प्रभाग झाले असून, एकने नगरसेवकांची संख्या कमी होऊन २३ नगरसेवक राहणार आहेत. नवीन आरक्षणामुळे नगरसेवक सुनील वाघ, ललिता भालेराव, महिन्याभरापूर्वी पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या सुनंदा मोरे अडचणीत आले आहेत.
नवीन प्रभाग क्रमांक १७ मध्ये सध्याचा प्रभाग ३२ व ३६ चा बहुतांश भाग आला असून, प्रभाग ३३ व उपनगर इच्छामणी मंदिर परिसराचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग १७ (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागसवर्ग प्रवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक शैलेश ढगे, कमल आढाव यांची अडचण दूर झाली आहे. अनुसूचित जाती असे आरक्षण झाल्याने विद्यमान नगरसेविका ललिता भालेराव यांची अडचण झाली असली तरी त्यांचे पती व माजी नगरसेवक संजय भालेराव यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जेलरोड प्रभाग १८
जेलरोडचा नवीन प्रभाग क्रमांक १८ मध्ये प्रभाग ३५ व ३३ बहुतांश भाग आला असून, आजूबाजूच्या प्रभागांचा थोडासा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग १८ (अ) अनुसूचित जाती (ब) नागरिाकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला (ड) सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. आरक्षणानुसार नगरसेवक अशोक सातभाई रंजना बोराडे, पवन पवार, पोटनिवडणूकीत निवडून आलेल्या मंदाबाई ढिकले यांचा मार्ग खुला झाला आहे.
रेल्वेपलीकडचा प्रभाग १९
नाशिकरोड रेल्वेलाइनपलीकडील पूर्वभागातील गोरेवाडी, चेहेडी, चाढेगाव, सिन्नरफाटा, चेहेडी पंपिंग, गावठाण व मळे परिसर मिळून प्रभाग १९ ची रचना करण्यात आली आहे. यामध्ये सध्याच्या प्रभाग ३४ व ५७ चा बहुतेक भाग समाविष्ट करण्यात आला आहे. लोकसंख्या व प्रभाग संख्येनुसार या प्रभागात त्रिसदस्य राहणार आहे. प्रभाग १९ (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (क) सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणानुसार विद्यमान नगरसेवक कन्हैया साळवे, वैशाली भागवत हरीष भडांगे, शोभा आवारे हे निवडणूक लढू शकतात.
प्रभाग क्रमांक २०
नवीन प्रभाग क्रमांक २० मध्ये सध्याच्या प्रभाग ५६ चा मोठा भाग आला असून त्याबरोबर प्रभाग ५९,३६,५५ व ३५ चा कमी जास्त भाग समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग २० (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला (क) सर्वसाधारण महिला (ड) सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. नगरसेवक संभाजी मोरुस्कर, सविता दलवाणी यांना निवडणूक लढविण्यास अडचण निर्माण झालेली नाही.