शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही दौरा केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल

By admin | Updated: December 15, 2014 02:11 IST

मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही दौरा केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल

नाशिक : रविवारच्या सुट्टीच्या दिवशी विश्रांतीच्या मूडमध्ये असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना सकाळी-सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक जिल्ह्यातील गारपीटग्रस्तभागाचा दौरा करणार असल्याचा सांगावा आला आणि शासकीय यंत्रणा लगोलग हलली. रविवारी मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही दौरा केल्याने अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. मुख्यमंत्री पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने भाजपाचे, तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा नाशिकला येणारे एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही हातोहात निरोप देऊन कार्यकर्त्यांचा ताफा जमा करावा लागला. नाशिक जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे बागलाण, निफाड, मालेगाव, नांदगाव, देवळा व येवला या तालुक्यांमध्ये सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. हिवाळी अधिवेशनात सभागृहात त्याचे तीव्र पडसाद तर उमटलेच शिवाय नुकसानग्रस्त शेतकरी रस्त्यावर येत आंदोलन करू लागले आहेत. सोमवारी (दि.१५) विधिमंडळात याप्रश्नी रणकंदन माजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी-सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचा निरोप जिल्हा प्रशासनाकडे आला आणि प्रशासकीय यंत्रणेची एकच धांदल उडाली. मुख्यमंत्री यांचा नियोजित दौरा मुंबईत होता. परंतु दौऱ्याच्या अर्धा तास अगोदर जिल्हा प्रशासनाला फॅक्सद्वारे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अंशत: बदल झाल्याचे सांगत ते नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार नागपूर येथून मुख्यमंत्री नाशिककडे रवाना झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. एकीकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचाही अचानक दौरा लागल्याने त्यांच्या दौऱ्यासाठीही अधिकाऱ्यांची पळापळ झाली. पोलीस यंत्रणाही सतर्क झाली. (प्रतिनिधी)