शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव विभागासाठी स्वतंत्र पथकाचा प्रस्ताव

By admin | Updated: February 27, 2015 22:46 IST

मालेगाव विभागासाठी स्वतंत्र पथकाचा प्रस्ताव

मालेगाव : लाचखोरीच्या वाढत्या घटना पाहता मालेगाव विभागासाठी स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक पथक तयार करण्याचा प्रस्ताव आपण राज्य शासनास सादर केला असल्याची माहिती नाशिक विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मालेगाव उपविभागात अलीकडच्या काळात लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. याव्यतिरिक्त आपल्याकडे लाच मागितली जाते अशा अनेक तक्रारी विभागास प्राप्त होत्या. अशा सर्व तक्रारदारांना वेळेवर सेवा मिळावी, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे व लाचखोरास त्वरित पकडले जावे यासाठी मालेगाव विभागासाठी स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्थापण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक पवार यांनी सांगितले.तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तक्रारदारांसाठी १०६४ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. तक्रारदार कोणत्याही दूरध्वनी वा भ्रमणध्वनी सेवेवरून या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार सहजतेने नोंदवू शकतो. तक्रार दाखल झाल्यावर तक्रारदारास त्वरित मदत मिळेल. तसेच सापळ्यासाठी वापरण्यात आलेला पैसाही महिनाभरात तक्रारदारास परत दिला जाईल. या टोल फ्री हेल्पलाइनचा लाभ घेऊन नागरिकांनी लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीला मदत करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक पवार यांनी शेवटी केले आहे.