शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक शेट्टीचा तडीपारीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:25 IST

पंचवटीतील सराईत गुन्हेगार जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या युवकाच्या खून प्रकरणात जामिनावर तर जुगार खेळत असताना रंगहाथ पकडल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा पंचवटीतील नगरसेवक हेमंत शेट्टी याच्या विरोधात शासनाकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़

नाशिक : पंचवटीतील सराईत गुन्हेगार जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या युवकाच्या खून प्रकरणात जामिनावर तर जुगार खेळत असताना रंगहाथ पकडल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा पंचवटीतील नगरसेवक हेमंत शेट्टी याच्या विरोधात शासनाकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ गुन्हेगारांना आश्रय देणे, जुगार अड्डे चालविणे तसेच गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यात शेट्टीविरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत़  २०१५ मध्ये सराईत गुन्हेगार ज्वाल्या उगलमुगले याचा खून करण्यात आला होता़ या खून प्रकरणात भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टीसह त्याच्या गुन्हेगार साथीदारांचा समावेश असल्याचे पंचवटी पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले होते़ या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शेट्टी कारागृहाबाहेर आला़ सोमवारी (दि़१२) सायंकाळी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने पंचवटीतील वाल्मीकनगरजवळील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागी सुरू असलेल्या जुगारावर सायंकाळी छापा टाकला़ याठिकाणी भाजपा नगरसेवक संशयित हेमंत शेषअण्णा शेट्टीसह आठ संशयित जुगार खेळत होते़ पोलिसांना पाहताच नगरसेवक हेमंत शेट्टी (रा़ कृष्णनगर, पंचवटी) फरार झाला होता़पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आगामी निवडणुका व पंचवटीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेमंत शेट्टीसह ३० सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला असून, तो वरिष्ठांकडे पाठविला आहे़ दरम्यान, जुगाराच्या गुन्ह्यात न्यायालयाने शेट्टीचा जामीन अर्ज फेटाळला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़शहरातून आणखी  तीस तडीपारभाजपा नगरसेवक हेमंत शेट्टीबरोबरच शिवसेनेचे सुहास कांदे, इश्तियाक कोकणी, दीपक डोके यांच्याही तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्यामुळे वरिष्ठांच्या संमतीनंतर हे प्रस्ताव पाठविले जाणार असून, लवकरच ही तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली़

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिस