शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:44 IST

घोटी : आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सद्रोद्दिन येथे ४७ एकर (१८ हेक्टर ७३ आर) जागेत रखडलेल्या राज्यातील पहिल्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला चालना मिळाली असून नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रबोधिनीसाठी ६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात निधी : शासनाकडून ६० कोटींची तरतूद

घोटी : आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सद्रोद्दिन येथे ४७ एकर (१८ हेक्टर ७३ आर) जागेत रखडलेल्या राज्यातील पहिल्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला चालना मिळाली असून नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रबोधिनीसाठी ६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.अनुसुचित जमातीच्या मुलांमध्ये जन्मतःच असलेल्या विविध क्षमता, त्यांचे क्रीडा नैपुण्य काही ठराविक खेळाकरिता उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे अनुसुचित जमातीच्या मुलांना क्रीडा विषयक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास ही मुले अनेक खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात असा विश्वास शासनाला असल्यामुळे आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे प्रबोधिनीचे घोंगडे भिजत पडले होते.

मात्र यंदाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात या क्रीडा प्रबोधनीसाठी ६०कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.                                         क्रीडा प्रबोधिनी करीता इगतपुरी तालुक्यात जलसंपदा विभागाची प्रिप्री सद्रोद्दिन येथील जमीन आदिवासी विकास विभागास हस्तांतरीत करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरू होते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेचाही फटका या प्रबोधिनीला बसला होता. आता निधीची तरतूद झाल्याने आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.आजपर्यंत या क्रीडा प्रबोधनीचा प्रश्न अनुत्तरीतच होता. अनुसुचित जमातीच्या मुलांना क्रीडा विषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या क्रीडा प्रबोधिनीचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रबोधिनीसाठी तरतूद करत चालना दिलेली आहे.- हिरामण खोसकर, आमदार

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीPoliticsराजकारण