शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बाशिंगे अन् येसोजी वीरांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 1:56 AM

वाजत गाजत डोक्यावर बाशिंग बांधून भगवे वस्त्र परिधान करत पारंपरिक प्रथेनुसार गुरुवारी (दि.२१) जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बाशिंगे वीराची मिरवणूक काढण्यात आली. तसेच घनकर गल्लीतून येसोजी महाराज वीरालाही वाजत-गाजत परिसरातून मिरवण्यात आले.

ठळक मुद्देपरंपरा : वाजत गाजत नृत्य

नाशिक : वाजत गाजत डोक्यावर बाशिंग बांधून भगवे वस्त्र परिधान करत पारंपरिक प्रथेनुसार गुरुवारी (दि.२१) जुन्या नाशकातील बुधवार पेठेतून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बाशिंगे वीराची मिरवणूक काढण्यात आली. तसेच घनकर गल्लीतून येसोजी महाराज वीरालाही वाजत-गाजत परिसरातून मिरवण्यात आले.हळदीच्या नवरदेवाचा घातपाती मृत्यू झाल्यामुळे विवाहाची इच्छा अपूर्ण राहिली तेव्हापासून हा वीर बाशिंग लावून मिरवीत लोकांचे प्रश्न सोडवित आहे, अशी अख्यायिका बाशिंगे वीराच्या मिरवणुकीमागे सांगितली जाते. दरवर्षी बुधवार पेठेतून विनोद बेलगावकर बाशिंगे वीराच्या भूमिक ा साकारून पारंपरिक वाद्याच्या तालावर दुपारपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत गावातून थिरकत गोदाघाटावरून वळसा घालत पुन्हा बुधवार पेठेत येतो. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पारंपरिक वाद्य वादनाचा गजर करत बाशिंगे वीराची मिरवणुकीला बुधवारपेठेतून सुरुवात करण्यात आली. बुधवारपेठ, चव्हाटा, काजीपुरा, वाकडी बारव, दूधबाजार, भद्रकाली अशा विविध परिसरांतून वाजतगाजत मिरवत वीर रात्रभर नृत्य करत गंगाघाटावर पोहचले. रात्रभर चाललेल्या या मिरवणुकीचा समारोप पहाटे करण्यात आला.दरम्यान, संध्याकाळी घनकरगल्ली येथील तुळजाभवानी मंदिरापासून येसोजी महाराज वीराची पारंपरिक मिरवणूक मोरे कुटुंबीयांकडून काढण्यात आली. सदानंद मोरे हे वीराच्या भूमिकेत होते. या मिरवणुकीला सुमारे १६० वर्षांची परंपरा आहे. तसेच रविवार कारंजा येथून मानाचा दाजीबा वीराची मिरवणूक भागवत कुटुंबियांकडून काढण्यात आली.बालवीरांनी वेधले लक्षगोदाकाठावर पेटविण्यात आलेल्या होळीभोवती बालवीरांनी फेºया मारत धुळवडीचा आनंद लुटला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यासह भोले शंकर, भगवान श्रीकृष्ण, श्री खंडेराव वेशभूषेत बालके दिसून आली. या बालवीरांनी वाजत गाजत नृत्य करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले.म्हणून पडले बाशिंगे अन् दाजिबा नाव४‘बाशिंगे’ आणि ‘दाजिबा’ हे नाव या वीराला पडले त्यामागे मोठी अख्यायिका सांगितली जाते. लग्न मांडवात जाताना नवरदेवाला ‘दाजी’ म्हणून संबोधिले जाते म्हणून ‘दाजिबा’ तर हळद लावल्यानंतर बाशिंग लावून नवरदेव मिरवितो म्हणून ‘बाशिंगे’ असे नाव पडल्याचे बोलले जाते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम