शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांना अवमान याचिका पूर्व नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:57 IST

उच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाने कारवाई केली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा बाजार उभा राहत असताना मात्र प्रशासन सोयीने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करणाऱ्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना अवमान याचिका पूर्व नोटीस बजावली आहे.

नाशिक : उच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाने कारवाई केली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा बाजार उभा राहत असताना मात्र प्रशासन सोयीने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करणाऱ्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना अवमान याचिका पूर्व नोटीस बजावली आहे.सोमवारी (दि.११) दातीर यांनी आयुक्त गमे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नोटीस बजावली आहे. न्यायालयाने १७ जानेवारी रोजी सातपूर-अंबड लिंकरोडवरील बेकायदेशीर भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने यांसदर्भात कार्यवाहीदेखील केली. परंतु त्यानंतर पुन्हा हा बाजार वसला असून त्यांना हटविण्यासाठी दातीर यांनी पाठपुरावा केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी बाजार हटविण्याची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आपले साहित्य उचलून नेले होते. मात्र, पोलीस आणि महापालिकेनेच माघार घेतली.अनेक विक्रेत्यांनी व्यवसाय नियमिततेसाठी महापालिकेने अर्ज केल्याचे नगररचना विभागाचे म्हणणे आहे, तर पोलिसांनीदेखील सणावाराचे निमित्त करून कारवाईसाठी बंदोबस्त करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर हा विषय मागे पडला.मुळात उच्च न्यायालयाने बेकायदेशीर भंगार बाजार हटवावा तसेच संबंधितांचे साहित्य जप्त करून ते नेट्ट करावे. तसेच शहराबाहेर व्यवसाय करण्यास प्रवृत्त करावे अशा प्रकारचे निर्देश दिला आहे. मात्र त्यानंतरदेखील प्रशासन दखल घेऊन कारवाई करीत नसल्याने महापालिकेच्या विरोधात अवमान याचिका का दाखल करू नये अशा आशयाची नोटीसच बजावल्याचे दातीर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त