नाशिकरोडला मटका अड्डयावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:00 IST2018-10-20T15:00:03+5:302018-10-20T15:00:16+5:30
नाशिक : वास्को चौकातील देशी दारू दुकानसमोर सुरू असलेल्या मटक्याच्या अड्डयावर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१९) सायंकाळी छापा मारला़ या प्रकरणी संशयिता केशव भिकाजी कांबळे (४८, रा़श्रमनगर, पगारे मळा,उपनगर) यास ताब्यात घेण्यात आले आहे़

नाशिकरोडला मटका अड्डयावर छापा
नाशिक : वास्को चौकातील देशी दारू दुकानसमोर सुरू असलेल्या मटक्याच्या अड्डयावर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१९) सायंकाळी छापा मारला़ या प्रकरणी संशयिता केशव भिकाजी कांबळे (४८, रा़श्रमनगर, पगारे मळा,उपनगर) यास ताब्यात घेण्यात आले आहे़
वास्को चौकातील देशी दारूच्या दुकानासमोरील मोकळ्या जागेत मटका सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता संशयित केशव कांबळे हा लोकांकडून कल्याण मटका जुगारावर अंक व आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळवित होता़ पोलिसानी कांबळे कडून १२ हजार ६७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़