मटका अड्ड्यावर छापा; १३ ताब्यात

By Admin | Updated: September 30, 2016 02:24 IST2016-09-30T02:23:31+5:302016-09-30T02:24:53+5:30

मटका अड्ड्यावर छापा; १३ ताब्यात

Print 13 possession | मटका अड्ड्यावर छापा; १३ ताब्यात

मटका अड्ड्यावर छापा; १३ ताब्यात

नाशिकरोड : शाहू पथ गोसावीवाडी येथे मटक्याच्या अड्ड्यावर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी छापा मारून १३ जणांना ताब्यात घेतले आहे.
गोसावी वाडी येथे मुंबई वरळी नावाचा अंकी मटका अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. धिवरे यांनी गुरुवारी दुपारी सदर मटका अड्ड्यावर छापा मारला असता पोलिसांनी जयंत पुजारी, अमरसिंह पटेल, संजय कांबळे, किशोर चव्हाण, राहुल चौरसिया, राजू राजपुत, सुरेश गाडेकर, संतोष बोडके, बैजनाथ बडवे, दीपक बागूल, बाळू फोंड, रंगनाथ अडसुळे, दर्शनसिंग धारा या १३ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून १३ हजार ३७० रुपये रोख तीन दुचाकी, आठ मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर असा एकूण एक लाख २८ हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Print 13 possession