शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उपक्रमशीलतेला लाभले राष्ट्रपती पुरस्काराचे कोंदण !

By admin | Updated: September 4, 2015 21:59 IST

शिक्षक दिन विशेष : शाळेतील दोन अनाथ मुलांना दत्तक घेऊन केले दहावीपर्यंतचे शिक्षण

शरद नेरकर, नामपूरप्रामाणिकपणे व निष्ठेने ज्ञानदान करणे हे प्रत्येक शिक्षकाचे आद्यकर्तव्य. परंतु हे कर्तव्य पार पाडीत असताना स्वत: जन्मजात अपंगत्वाचे दु:ख बाजूला सारून विद्यार्थ्यांप्रति ममत्वाची भावनाही हृदयाच्या कप्प्यात जपतो आणि आपल्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून अपंग मुलांना हातभार लावताना सेवाभावही जोपासतो. तसेच आपल्याच शाळेतील दोन अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, असा शिक्षक विरळच असतो.सोपान गोकुळराव खैरनार. बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील रहिवाशी. १९८८ मध्ये ज्ञानदानाचे व्रत स्वीकारलेल्या खैरनार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले. स्वत: हार्मोनियम व तबलावादक असल्याने त्यांच्याच प्रयत्नातून पूर्वीच्या जुनी बेज व सध्याच्या मोरेनगर शाळेत संगीतमय परिपाठ घेण्याची सवय लावली. सुंदर हस्ताक्षरासाठी सुलेखन पुस्तिकेची निर्मिती व राज्यातील पहिली ऑनलाइन शाळेचा मान जुनी बेजच्या शाळेला मिळवून दिल्याने यूएसएच्या तज्ज्ञांनी त्यांना शाबासकीची थाप दिली. मोरेनगरच्या शाळेत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खैरनार यांनी ‘स्कॉलर मंत्रा’ नावाचे सॉफ्टवेअर बनविले असून, आदर्श शाळांना त्यांनी ते भेट म्हणूनही दिले आहेत.बलिधर्म चॅरिटेबल ट्रस्टकडून मिळालेल्या पुरस्काराची ५0 हजार रुपयांची रक्कम अपंग मुलांसाठी दिली तर तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराची दहा हजार रुपयांची रक्कम दोन अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणावर खर्च केली. खैरनार यांचा ‘बिनदप्तराची शाळा’ हा शैक्षणिक उपक्रम राज्यभर गाजला. तसेच ‘फन फेअर ऑफ मोरेनगर’ या उपक्रमातून मोरेनगर शाळेतील विद्यार्थ्यांना संशोधक बनण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून पारितोषिके पटकावली आहेत. त्यांच्या योगदानामुळेच त्यांना आज राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले जात आहे. पुरस्कार खूप मिळालेत; पण स्वप्नातला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने खूपच आनंद झाला. विद्यार्थी हे दैवत आणि अध्यापन हे कर्तव्य मानून अनेक पिढय़ा घडवल्या. ठरवले असते तर मोठा अधिकारीही होऊ शकलो असतो, परंतु विद्यार्थी घडविण्यात जो आनंद आहे, त्यापेक्षा मोठा आनंद कशातच नाही. - सोपान खैरनार, शिक्षक, सटाणा