शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया, इंटरनेट बॅँकिंगचा वापर करताना सावधगिरी

By admin | Updated: April 19, 2015 00:45 IST

सोशल मीडिया, इंटरनेट बॅँकिंगचा वापर करताना सावधगिरी

नाशिक : सायबर हॅकर्स आपल्या आजूबाजूलाच असतात. आपल्याकडून इंटरनेट हाताळताना होणाऱ्या चुकांवर ते बारीक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे सोशल साइट अथवा कोणाला ई-मेल पाठविताना नेहमी ‘थांबा, विचार करा आणि पोस्ट करा’ या सूत्राचा वापर करायला हवा, असे प्रतिपादन गुरगाव व यूपी पोलिसांच्या सायबर क्राइम सेलचे सल्लागार तथा इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशनचे कन्सल्टंट, ज्येष्ठ सायबरतज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.महाकवी कालिदास कलामंदिर येथे जितो (जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन) संघटनेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी टंडन यांनी स्मार्टफोन, सोशल मीडिया, इंटरनेट बॅँकिंगचा वापर करताना कोणत्या बाबींची सावधगिरी बाळगायला हवी, याबाबतची माहिती दिली. दरदिवसाला सोशल मीडियावरील क्राइमच्या घटना ऐकावयास मिळतात. या घटना लहान मुलांकडून सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याने सर्व पालकांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. २०१३ मध्ये दाखल झालेल्या पाच हजार ६९३ सायबर गुन्ह्यांमध्ये तीन हजार ३०१ गुन्हे १८ ते ३० वयोगटातील तरुणांकडून घडले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना खबरदारी घ्यायला हवी. विशेषत: तरुणींनी याबाबत अधिक दक्ष असायला हवे. इंटरनेट बॅँकिंग, स्मार्टफोनचा वापर करताना सर्व सुरक्षेच्या मुद्यांचा अभ्यास करायला हवा, अन्यथा हॅकर्सच्या जाळ्यात अडकावे लागेल. स्मार्टफोनच्या युगात सर्व माहिती एका क्लिकवर मिळत असली तरी, हॅकर्सचा त्यावर डोळा आहे, हे विसरू नये. सध्या देशात ३० कोटी जनता इंटरनेटचा वापर करते. मात्र, यातील काहींच्या प्रायव्हसीबाबत माहिती ठेवतात. आपला मोबाइल, लॅपटॉप यावर दिलेल्या प्रायव्हसीचा कटाक्षाने वापर करायला हवा. कारण हॅकर्स कुठलीही वेबसाइट अथवा माहिती हॅक करण्यात तरबेज झाल्याने प्रचंड धोका वाढला आहे. वाय फायचा वापर करताना मोडीयमचा पासवर्ड बदला. डब्ल्यूईपी न ठेवता डब्ल्यूपीके-२ या मोडवर ठेवा. फ्रिक्वेन्सी कमी ठेवा.आता तर सरकारी वेबसाइट हॅक करण्याइतपत त्यांची मजल गेली असून, मध्यतरी सीबीआयची अधिकृत वेबसाइट हॅकर्सनी हॅक केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशात घडलेल्या काही धक्कादायक घटनांची रक्षित टंडन यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी उपस्थित युवकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान त्यांनी केले. (प्रतिनिधी)