Prantadhikari visits Kovid Center | प्रांताधिकारी यांची कोविड सेंटरला भेट

इगतपुरी येथील कोविड सेंटरची पाहणी करताना प्रांताधिकारी चव्हाण.

ठळक मुद्देनवीन कोरोना सेंटरसाठी इगतपुरी येथे भेट देऊन जागेची पाहणी

वैतरणानगर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व वाढत्या रु ग्ण संख्येमुळे निर्माण होणाऱ्या अडीअडचणीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी कोरोना सेंटरची पाहणी करत नवीन कोरोना सेंटरसाठी इगतपुरी येथे भेट देऊन जागेची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब,माझे आरोग्य’ ही घोषणा केली असुन इगतपुरी व त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण जनजागृती करण्यासाठी अहोरात्र इगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्यातील खेडो-पाडी, वाडी-वस्तीला भेट देऊन सूचना करत असुन दोन्ही तालुक्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करत आहे.
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासन सर्व उपाययोजना करत असल्याचेही प्रांताधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
 

Web Title: Prantadhikari visits Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.