शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदी प्रमोद चोथवे बिनविरोध

By admin | Updated: December 30, 2016 23:16 IST

सिन्नर : शिवसेनेकडून विजय जाधव, मंगला शिंदे तर भाजपाचे रामनाथ लोणारे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी

सिन्नर : पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रमोद झुंबरलाल चोथवे यांची बिनविरोध झाली. स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे विजय कारभारी जाधव व मंगला वसंत शिंदे याांची, तर भाजपाचे रामनाथ भाऊशेठ लोणारे यांची वर्णी लागली.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात प्रमोद चोथवे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. पालिका निवडणुकीत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे १७, तर भाजपाचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत. प्रणाली भाटजिरे (गोळेसर) या शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्याने सेनेचे संख्याबळ १८ झाले आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उपनगराध्यक्षपदी सेनेचे प्रमोद चोथवे यांची बिनविरोध निवड झाली.
सकाळी १० ते १२ या वेळेत उपनगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे प्रमोद चोथवे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून नगरसेवक गोविंद लोखंडे, तर अनुमोदक म्हणून शैलेश नाईक यांची स्वाक्षरी होती. दुपारी १२ वाजता पालिका सभागृहात शिवसेना व भाजपा नगरसेवक दाखल झाले. नगराध्यक्ष डगळे यांनी उपनगराध्यक्ष-पदासाठी चोथवे यांचा एकमेव अर्ज आल्याचे सांगितले. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी चोथवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा त्यांनी केली.  यावेळी मुख्याधिकारी दुर्वास यांच्या हस्ते चोथवे यांच्यासह तिघा स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सभागृहात शिवसेना नगरसेवक बाळू उगले, नलिनी गाडे, श्रीकांत जाधव, प्रतिभा नरोटे, सुजाता भगत, हेमंत वाजे, विजया बर्डे, प्रणाली भाटजिरे (गोळेसर), सुजाता तेलंग, निरूपमा शिंदे, ज्योती वामने, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, गीता वरंदळ, रूपेश मुठे, भाजपाचे गटनेते नामदेव लोंढे, संतोष शिंदे, शीतल कानडी, मल्लू पाबळे, अलका बोडके, सुहास गोजरे, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, मालती भोळे, चित्रा लोंढे उपस्थित होते.  उपनगराध्यक्षपदी चोथवे यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी पालिकेत प्रवेश केला. आमदार वाजे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष प्रमोद व स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात  आला. त्यानंतर चोथवे यांनी आमदार वाजे यांच्या उपस्थितीत   उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. दुसरीकडे भाजपाचे विरोधी गटनेते नामदेव लोंढे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला.   सेना कार्यकर्त्यांनी उपनगराध्यक्ष चोथवे व स्वीकृत नगरसेवकांची विजयी मिरवणूक काढली. वावी वेस भागातील डॉ.बाबासाहेब   आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)