शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

वीज, पाण्यावाचून नाशिककर बेहाल; उष्म्याच्या तीव्रतेत पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 9:17 PM

महावितरण कंपनीने शनिवारी जाहिर निवेदनाद्वारे शहरातील १५ उपकें द्रांवरुन सकाळी आठ व दहा वाजेपासून वीजपुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देकमाल तपमानाचा पारा शनिवारी ३८.७ इतका होता नागरिकांना पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रे घरात असूनदेखील त्याचा वापर करता आला नाही

नाशिक : महावितरणने अचानकपणे शनिवारी (दि.५) वीज वाहिन्यांची दुरूस्ती व नवीन कामांच्या निमित्ताने शहरातील सर्वच उपकेंद्रांवरुन विविध उपनगरीय भागांमध्ये होणारा वीजपुरवठा कमाल आठ तास तर किमान तीन तास खंडीत केल्याने नागरिकांचे हाल झाले. वीजपुरवठा खंडित राहिल्याने गंगापूर धरणावरुन पंपीगही होऊ शकले नाही, त्यामुळे सकाळी काही भागात अपुरा पाणीपुरवठा तर काही भागात दुपारी व संध्याकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.महावितरण कंपनीने शनिवारी जाहिर निवेदनाद्वारे शहरातील १५ उपकें द्रांवरुन सकाळी आठ व दहा वाजेपासून वीजपुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली. वीजपुरवठा खंडीत होण्याामागे दुरूस्तीचे कारण जरी देण्यात आले असले तरी ऐनवेळी शनिवारी सकाळी वर्तमानपत्रातून महावितरणकडून वीजपुरवठा खंडीत होणार असल्याबाबत सूचना निवेदनाद्वरे दिली गेली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. वीजपुरवठा खंडीत केल्याचा कालावधी अधिक असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सकाळपासून तर दुपारपर्यंत नागरिकांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ वीजपुरवठ्याला मुकावे लागले. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले. शहराच्या कमाल तपमानाचा पारा शनिवारी ३८.७ इतका होता. वीज गायब राहिल्याने उष्णतेची तीव्रता अधिकच जाणवली. उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांना पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रे घरात असूनदेखील त्याचा वापर करता आला नाही. अनेकांचे मोबाईलदेखील बंद पडले. मोबाईलच्या बॅटऱ्यांमधील ऊर्जा संपल्याने नागरिकांचा ‘संपर्क’ही कमकुवत झाला होता.

उपकेंद्रनिहाय वेळ व प्रभावीत परिसरदेवळाली कॅम्प- सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या केंद्रावरुन आनंदरोड ते धोंडीरोड शिंगवे बहुल्यापर्यंत परिसर.सातपूर - सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत या केंद्रावरुन गंगापूर गाव ते शिरीन मेडोजपर्यंत.दत्तमंदीर- सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या केंद्रावरुन जगताप मळा ते के.जे मेहता शाळेच्या परिसर.उपनगर- दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत या केंद्रावरुन गांधीनगर ते रामदास स्वामीनगर पर्यंत.पंचक- दोन उपकेंद्रांवरुन सिन्नरफाटा ते जेलरोडपर्यंत सर्वच भागात तीन ते सात तास वीजपुरवठा नव्हता.मखमलाबाद- उपकेंद्रावरुन मखमलाबाद गाव ते पेठरोडचा परिसरटाकळी- सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत वडाळानाका ते काठेगल्ली परिसर.शिवाजीवाडी-सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बोधलेनगर, अशोका मार्ग, साईनाथनगर, इंदिरानगर ते रविशंकर मार्गसह वडाळागाव परिसर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPower Shutdownभारनियमन