शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

बाजार समितीच्या कामांना शासनाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:06 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य सहकारी बॅँकेकडून कर्ज घेतले असून, या कर्जाची अद्याप परतफेड केली नसल्याने कर्ज घेतांना बाजार समितीने स्वमालकीच्या जागा व मालमत्ता बॅँकेकडे तारण, गहाण ठेवली आहे. कोट्यवधी रुपये कर्ज फेडण्यास बाजार समिती अपयशी ठरल्याने राज्य सहकारी बॅँकेने बाजार समितीच्या मालमत्ता जप्त

ठळक मुद्देसहकार बॅँकेचीही नोटीस : कायदेशीर कारवाईचा इशारा बेकायदेशीर व्यवहाराबाबत थेट सहकार विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर व हरसूल येथे नवीन उपबाजार समिती बांधकामाला राज्य सहकारी बॅँकेने हरकत घेण्यापाठोपाठ मंगळवारी राज्याच्या सहकार व पणन मंत्रालयानेही बाजार समितीने नवीन बांधकामांसाठी मागविलेल्या निविदांना स्थगिती दिली आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्य बॅँकेने बाजार समितीच्या जागांवर कायदेशीर कारवाईच्या नोटिसा चिकटविल्यानंतर मंगळवारी बाजार समितीलाही नोटीस बजावली असून, त्यात फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य सहकारी बॅँकेकडून कर्ज घेतले असून, या कर्जाची अद्याप परतफेड केली नसल्याने कर्ज घेतांना बाजार समितीने स्वमालकीच्या जागा व मालमत्ता बॅँकेकडे तारण, गहाण ठेवली आहे. कोट्यवधी रुपये कर्ज फेडण्यास बाजार समिती अपयशी ठरल्याने राज्य सहकारी बॅँकेने बाजार समितीच्या मालमत्ता जप्त करून मध्यंतरी त्यांचा लिलाव करून पैसे वसुलीची कार्यवाहीही सुरू केली होती. बाजार समितीच्या मालमत्ता बॅँकेच्या ताब्यात असताना बाजार समितीच्या संचालकांनी हरसूल व त्र्यंबकेश्वर येथे अ‍ॅग्रीकल्चर मार्केट आणि कमर्शियल सेंटर डेव्हलपमेंटचे काम करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी बांधकाम ठेकेदारांकडून निविदा मागविल्या आहेत. या निविदांची जाहिरात प्रसिद्ध होताच, राज्य सहकारी बॅँक खडबडून जागी होत सोमवारी त्यांनी बाजार समितीला नोटीस दिली आहे. या नोटिसींची प्रत हरसूल व त्र्यंबकेश्वरच्या उपबाजार समित्यांच्या कार्यालयांमध्ये चिटकविल्या, त्याचबरोबर त्याची प्रत बाजार समितीलाही दिली. त्यामुळे बाजार समितीच्या प्रयत्नांना खो बसला असला आहे. बाजार समिती करीत असलेल्या बेकायदेशीर व्यवहाराबाबत थेट सहकार विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारींची दखल घेत सहकार विभागाने मंगळवारी बाजार समितीच्या सर्व प्रकारच्या बांधकामांना स्थगितीचे आदेश बजावले आहेत.सहकार खात्याने दिलेल्या स्थगिती आदेशात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट व व्यावसायिक सेंटर, हरसूल येथे आॅफिस बिल्डिंग व कम्पाउंड वॉल, नाशिक बाजार समितीत कम्पाउंड वॉल व पाइपलाइन वॉटर सप्लायसाठी ई-निविदा मागविल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती