शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची शक्यता

By admin | Updated: April 4, 2017 02:34 IST

नाशिक : लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहरात सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

 नाशिक : लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहरात सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. परंतु, प्रशासनाने अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सहाच प्रभाग ठेवण्याची विनंती केली असली तरी अधिकाधिक नगरसेवकांना पदांचा लाभ मिळावा, याकरिता सत्ताधारी भाजपाकडून महापालिकेत नऊ प्रभाग समित्यांच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.सद्यस्थितीत महापालिकेचे नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी व नाशिकरोड असे सहा विभाग आणि त्यानुसार सहा प्रभाग समित्या कार्यरत आहेत. नाशिक शहराची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार १४ लाखांपेक्षाही अधिक असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सहाऐवजी नऊ प्रभाग समित्यांची स्थापना होणे आवश्यक आहे. त्याबाबतचा प्रस्तावही प्रशासनाने येत्या महासभेत ठेवला असला तरी अपुरे मनुष्यबळ, वाढता आस्थापना खर्च पाहता नऊऐवजी सहाच प्रभाग समित्या कायम ठेवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार, प्रशासनाने ३१ प्रभागांची विभागणीही केली आहे. मात्र, महापालिकेत एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपाकडून प्रशासनाची विनंती ठोकरली जाण्याची शक्यता असून, निवडून आलेल्या नगरसेवकांना अधिकाधिक पदांचा लाभ पोहोचविण्यासाठी नऊ प्रभाग समित्यांची रचना केली जाण्याची शक्यता आहे. महासभेने नऊ प्रभाग समित्यांची रचना करण्याचे आदेश दिल्यास महापालिका प्रशासनाला ३१ प्रभागांची विभागणी करावी लागणार असून, काही विभागांमध्ये चार तर काही विभागांमध्ये तीन प्रभाग समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)