शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळलेल्या तारांमुळे धोका

By admin | Updated: September 11, 2016 01:01 IST

शेतकऱ्यांमध्ये संताप : वीज वितरणचे दुर्लक्ष

स्थळ :पिळकोसवेळ : दुपारी १२ वाजता पिळकोस येथील पिवळ शिवारातील ग्रुप नं. २ मधील विद्युतवाहक तारा शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्या असून, त्या मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. प्रत्येक खांबातील अंतर अधिक असल्यामुळे या वीजवाहक तारा हाताला लागतील अशा स्थितीत असल्याने शेतकऱ्यांना शेतात कामे करता येत नाही. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीचे कामे करावी लागत आहे. हा तारा वीस ते तीस शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्या असून, त्या लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीकडून हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. पिळकोस येथील शेतकरी संजय गुजबळ जाधव या शेतकऱ्याला शेतात मका पिकाला पाणी देत असताना विजेचा धक्का लागल्याने गावातील व शिवारातील शेतकरी बांधवांकडून वीज वितरण कंपनीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फोनद्वारे, तोंडी, समक्ष भेटून परिस्थिती सांगितली नंतर लेखी अर्ज दिला; मात्र महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्यामुळे अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रामदास बच्छाव, साहेबराव रेवबा जाधव, अभिजित वाघ, पंकज बच्छाव, प्रकाश जाधव, सचिन जाधव, संजय जाधव, रामराव वाघ, प्रवीण मोरे, जगन्नाथ गांगुर्डे यांसह शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ ऊर्जामंत्री यांच्याकडे दाद मागणार आहेत. (वार्ताहर)