भाविक महिलेच्या पर्सची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:19 IST2018-11-17T22:51:43+5:302018-11-18T00:19:46+5:30
पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़

भाविक महिलेच्या पर्सची चोरी
नाशिक : पंचवटीतील गोदाघाटावरील साती आसरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव स्टॅण्डवरील एकल अपार्टमेंटमधील रहिवासी कस्तुरी लुटे (पिंगळे) या दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोदाघाटावरील साती आसरा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांनी आपली पर्स मंदिराच्या खिडकीजवळ ठेवली असता चोरट्यांनी सदर पर्स चोरून नेली़
या पर्समध्ये दोन मोबाइल व पाचशे रुपये रोख असा ऐवज होता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
सुरक्षारक्षकाने चोरली कॉईल
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तीनशे किलो लोखंडाच्या कॉईल चोरी प्रकरणी पोलिसांनी संदीप शिरसाठ (४०) या सुरक्षारक्षकाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़
विपलकुमार कर्तार भुतानी (रा. उषाकिरण को-आॅपरेटीव्ह सोसायटी, सिटी सेंटर मॉलसमोर, नाशिक) यांनी सातपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील एस अॅण्ड एस वॉटर प्रॉडक्ट कंपनीत संदीप शिरसाठ हा सुरक्षारक्षकाचे काम करतो़ ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत संशयित शिरसाठ याने कंपनीतील ४१ हजार ४१८ रुपयांच्या ३०० किलो वजनाच्या लोखंडी तारांच्या १२ कॉईल (कच्चा माल) चोरून नेल्या.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़