शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख बालकांना पोलिओचे डोस

By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST

शहरात महापौर मुर्तडक यांच्या हस्ते शुभारंभ; आणखी तीन दिवस सुरु राहणार मोहीम

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात १ लाख २७ हजार ४५० बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ३ लाख ७३ हजार ४६५ असे एकूण ५ लाख ९१५ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, तर शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात ५५१ बुथ उभारण्यात आले होते़ यासाठी १६३३ कर्मचारी व ११५ पर्यवेक्षक, तर प्रभाग अधिकारी म्हणून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी ३०९५ बुथ लावण्यात आले होते़ यासाठी ७९१८ कर्मचारी व ६२७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती़ग्रामीण भागात पल्स पोलिओ मोहीम आणखीन तीन दिवस ही मोहीम राबविली जाणार असून, उर्वरित बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहे़ मंगळवार, बुधवार व गुरुवारी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी २४१० टीम, रेल्वे स्टेशन व बसस्थानकावर ३०६ बुथ तसेच १३८ मोबाइल टीम कार्यरत असणार आहेत़ या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विभागीय अधिकारी, खासगी सहा़ परिचारिका, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, अंगणवाडीसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)