शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हल्ल्यातील संशयित ताब्यात : बीट मार्शलांची कामगिरी

By admin | Updated: July 15, 2017 23:26 IST

मुख्य संशयिताला बीट मार्शलाच्या जोडीने नवीन मध्यवर्ती बस स्थानकावरुन ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने नाशिकमधील दूधबाजारातून पायी गस्त घालत असताना हवालदार बाळू शंकर खरे यांच्यावर अज्ञात युवकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेल्या सोमवारी घडली होती. या घटनेतील मुख्य संशयिताला बीट मार्शलाच्या जोडीने नवीन मध्यवर्ती बस स्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. खरे यांच्यावरील हल्ला येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून संशयित हल्लेखोराचे वर्णनाचा बिनतारी संदेश सर्वत्र दिला होता. या संदेशावरुन वर्णन लक्षात ठेवत भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस नाईक रमेश कोळी, हवालदार सुधीर चव्हाण यांनी नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अनोळखी इसमास चौकशीसाठी ताब्यात घेतले. हल्ल्यामधील वर्णनानुसार पोलिसांना या इसमावर संशय आला. त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने हल्ल्याची क बुली दिली आहे. संशयित रमेश जनार्दन जाधव (२९, रा. रायगड ) यास अटक केली आहे. घटनेच्या पाच दिवसानंतरदेखील केवळ वर्णन लक्षात ठेवून संशयित हल्लेखोराला अटक केल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस प्रोत्साहनपर जाहीर केले आहे.

....म्हणून पोलिसावर हल्लारायगड जिल्ह्यातील तराणी गावामध्ये राहणाऱ्या जाधव याची एक तक्रारीची चौकशी रायगड पोलिसांनी पुर्ण केली नाही. त्यामुळे पोलीसांचा राग मनात धरून जाधव याने जुने नाशिकमधील खरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलीस तपासात प्रथमदर्शनी पुढे आल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.