शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस-आरटीओकडून बसणार चाप

By admin | Updated: March 23, 2017 23:39 IST

नाशिक : रिक्षाचालकांकडून बेशिस्तीचे दर्शन घडते़ या प्रकारास चाप तसेच वाहनधारकांची शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत़

 नाशिक : शहराची ओळख ही वाहतूक शिस्तीवरून गणली जाते़ मात्र, शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनधारक तसेच रिक्षाचालकांकडून बेशिस्तीचे दर्शन घडते़ या प्रकारास चाप तसेच वाहनधारकांची शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत़ याचाच एक भाग म्हणून वाहतूक नियम व आरटीओच्या नियमांनुसार कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या रिक्षाचालकांना शहर वाहतूक पोलिसांकडून अधिकृत स्टिकर वाटप केले जात आहे़शहरातील वाहतुकीच्या शिस्तीसाठी वाहतूक पोलिसांना प्रादेशिक परिवहन विभागाचेही (आरटीओ) सहकार्य मिळते आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ सिंघल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या आदेशानुसार आरटीओ अधिकारी व शहर पोलीस वाहतूक शाखेकडून रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून अधिकृत रिक्षांना स्टिकर दिले जात आहे़ यामुळे शहरातील अनधिकृत रिक्षा त्वरित ओळखता येणार असून, कारवाई करण्यास सोपे होणार आहे़शहर वाहतूक शाखा व आरटीओ यांनी संयुक्तपणे अवैध रिक्षाचालकांविरोधात मोहीम राबवून ३६० विनापरवाना रिक्षा जमा केल्या आहेत़ तसेच परवाना, फिटनेस, लायसन्स असे पूर्तता असणाऱ्या ८८८ रिक्षाचालकांना स्टिकरचे वाटप करण्यात आले आहे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५८ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून ९२ हजार ७०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे़ दरम्यान, कागदोपत्री अपूर्ण असलेल्या १९ रिक्षाचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत़दरम्यान, आजमितीस नाशिक शहरात एकाच परवान्यावर अधिक रिक्षा, तसेच स्क्रॅप रिक्षा धावत असून त्यांची संख्या सुमारे दहा हजारांहून अधिक असल्याचा आरटीओ व पोलिसांचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)