८५ हजारांची चोरी करणाऱ्या संशयितास पोलीस कोठडी

By Admin | Updated: December 19, 2014 00:37 IST2014-12-19T00:37:14+5:302014-12-19T00:37:27+5:30

८५ हजारांची चोरी करणाऱ्या संशयितास पोलीस कोठडी

Police Kothadi suspected to steal 85 thousand | ८५ हजारांची चोरी करणाऱ्या संशयितास पोलीस कोठडी

८५ हजारांची चोरी करणाऱ्या संशयितास पोलीस कोठडी

नाशिक : एसटी बसमध्ये प्रवाशाची ८५ हजार रुपयांची रोकड लांबविणाऱ्या संशयितास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली़
महेमूद दादेखाँ पठाण (४०) राहणार देऊळगाव, जि़ बुलढाणा असे संशयिताचे नाव आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दि़ ६ दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पठाण याने द्वारका ते वडाळानाका बसमध्ये प्रवास करत असलेल्या नांदूरगाव येथील अक्षय मुरलीधर निमसे यांच्या बॅगमधून ८५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती़ याबाबत निमसे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती़
भद्रकाली पोलिसांनी संशयित पठाण यास पकडून चौकशी केली असता त्याने या चोरीची कबुली दिली़ तसेच पोलिसांनी त्याच्याकडून चार हजार रुपये वसूल केले आहेत़ आज पठाण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ (प्रतिनिधी)

Web Title: Police Kothadi suspected to steal 85 thousand