शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडच्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

By admin | Updated: September 12, 2016 01:11 IST

आॅनलाइन फसवणूक : बँकेतून बोलत असल्याचे सांगत घेतली माहिती

नाशिक : बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याबाबत माहिती घेऊन खात्यातील रक्कम आॅनलाइन पद्धतीने काढून फसवणूक करणाऱ्या झारखंडमधील टोळीचा नाशिक पोलिसांनी झारखंड पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केला आहे़ या टोळीतील नारायण सुकदेव मंडल व रोहित सुकदेव मंडल या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडे विविध बँकांचे बनावट पासबुक, एटीम व कागदपत्रे आढळून आली आहेत़ या अटक केलेल्या संशयितांना घेऊन पोलीस सोमवारी शहरात पोहोचणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेऊन आॅनलाइन पद्धतीने पैसे काढून घेण्याच्या प्रकारांत वाढ झाली होती़ अशाच प्रकारचा एक गुन्हा ४ जुलै रोजी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील चेहेडी शिव परिसरात घडला होता़ अजय शिवशंकर गुप्ता यांच्या बँक खात्यातून सुमारे पन्नास हजार रुपयांची रक्कम या भामट्यांनी आॅनलाइन पद्धतीने काढून घेतली होती़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांना तपास करण्याचे आदेश दिले होते़ निरीक्षक अनिल पवार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर गुप्ता यांच्या खात्यातील रक्कम ही झारखंड राज्यातील मारगोडीह येथे वर्ग झाल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश मजघर, किशोर खिल्लारे, भूषण चंदेल या तिघांचे एक पथक झारखंडला पाठविण्यात आले़ या पथकाने मारगोडीह गावात अहिल्यापूर पोलिसांच्या मदतीने संशयित मंडल याच्या घरावर छापा टाकला़ या ठिकाणी त्यांना ५ लाख १० हजार रुपयांची रक्कम तसेच बँकांचे बनावट पासबुक, लॅपटॉप, चेकबुक, विविध बँकांचे एटीम आढळून आले़ या टोळीकडून अनेक राज्यांतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वतृविली आहे़ दरम्यान, नाशिक पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)