शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण प्रकरणातील १३ आरोपींना पोलीस कोठडी

By admin | Updated: January 21, 2016 23:05 IST

अपहरण प्रकरणातील १३ आरोपींना पोलीस कोठडी

येवला : तालुक्यातील दोन युवकांची येवला-शिर्डी रस्त्यावरून तीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी ६० तासांच्या परिश्रमाने मोबाइल ट्रॅकिंग व स्थानिक खबऱ्याच्या माहितीनुसार जाळे रचले व अपहरणकर्त्यांच्या तावडीतून फिल्मी स्टाइल छापा टाकत नगरहून दोन मुख्य सूत्रधारांसह १३ जणांना गजाआड केले आहे. यातील १३वा आरोपी असिफ शेख, रा. मुंब्रा याला पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, हवालदार अभिमन्यू अहेर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. सुरुवातीचे बारा आरोपी सलमान शकील आदमाने (२६), रा. श्रीरामपूर, गणेश नारायण रसाळ (३३), रा. येवला यांच्यासह किरण सुनील कडू (२१), रा. शिर्डी, समीर रशीद बेग (२६), रा. राहता, राकेश वाल्मीक महानोर (२२), रा. राहता, नदी अन्सार पठाण (२५), रा. श्रीरामपूर, मंगेश बबनराव पवार (२८), रा श्रीरामपूर, गणेश नारायण शिरसाठ (३४), रा. अहमदनगर, स्वप्निल सुभेंद्र साळवी, (२३), रा. अहमदनगर, पूजा पंकज जैन (२५), रा. श्रीरामपूर, रचना सुभेंद्र साळवी (४०), रा. अहमदनगर, रविना सुभेंद्र साळवी (२१), रा. अहमदनगर यांना येवला न्यायालयाने बुधवारी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी दिली होती. गुरुवारी असिफ शेख या आरोपीला येवला न्यायालयात हजर केले असता यालादेखील पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला सलमान आदमने आणि किरण कडू हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी या गुन्ह्यातील गणेश रसाळ हा या कटातील मुख्य आरोपी ठरला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींनी पोलिसाची दिशाभूल केली. मात्र पोलीस यंत्रणेने जुन्याच म्हणजेच खबरी नेटवर्कचा वापर करून सूत्रबद्ध नियोजनामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. मुख्य सूत्रधाराने रचलेल्या कटानुसार अपह्रत दोन तरुणापैकी शाहबाज शेखला जीवे मारून राहुल चव्हाणलाच या गुन्ह्यात अडकवण्याचा मनसुबा पोलीस तपासात उघड झाल्याची चर्चा येवला शहरात सुरू होती. या प्रकरणातील युवतीकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी काही हनी ट्रॅप झाले आहे का, याचीदेखील माहिती मिळण्याची शक्यता पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी वर्तवली. या यशस्वी मोहिमेमुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)