लाचप्रकरणी पोलिसाला पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:35 PM2020-07-24T17:35:35+5:302020-07-24T17:35:56+5:30

लासलगाव : चांदवड येथे तक्र ारदाराकडुन पाच हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केलेल्या पोलिस हवालदार अशोक सुखदेव फुलमाळी यास निफाडच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Police custody in bribery case | लाचप्रकरणी पोलिसाला पोलिस कोठडी

लाचप्रकरणी पोलिसाला पोलिस कोठडी

Next

लासलगाव : चांदवड येथे तक्र ारदाराकडुन पाच हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केलेल्या पोलिस हवालदार अशोक सुखदेव फुलमाळी यास निफाडच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दहेगाव येथील तक्र ादारादारास त्याचेविरु ध्द दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात फुलमाळी याने पाच हजार रु पये लाचेची मागणी करु न ती स्विकारल्याबद्दल तपास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक संदिप साळुंखे यांचे पथकाने गुरु वारी रंगेहात अटक केली होती. त्यास शुक्र वारी निफाड येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयासमोर पोलिस निरिक्षक संदिप साळुंखे यांनी हजर केले सरकार पक्षाचे वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील अँड रामनाथ शिंदे यांनी गुन्ह्याच्या तपसाकामी साक्षीदारांचे जबाब आणि पंचनामा करु न गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयात केली.

Web Title: Police custody in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस