शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:07 AM

पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिका आज-उद्या खड्डे बुजेल म्हणता म्हणता तीन महिने लोटले तरी अनेक भागात खड्डे जैसे थे असून, आता महापालिका अपघातांची वाट बघत आहे काय, असा प्रश्न केला जात आहे.

नाशिक : पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरातील बहुतांशी भागात हीच अवस्था आहे. महापालिका आज-उद्या खड्डे बुजेल म्हणता म्हणता तीन महिने लोटले तरी अनेक भागात खड्डे जैसे थे असून, आता महापालिका अपघातांची वाट बघत आहे काय, असा प्रश्न केला जात आहे.पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे यांचे अतूट नाते आहे. पावसाळ्यात खड्डे पडणे स्वाभाविक असले तरी त्यानिमित्ताने महापालिकेच्या रस्त्याचा दर्जा कितपत आहे त्याचे पितळच उघडे पडत असते. कुंभमेळ्यानंतर स्वाभाविकच दोन वर्षे तरी खड्डे पडणार नव्हतेच. कारण सर्व रस्ते नवीन झाले आहेत, असे महापालिका अभिमानाने सांगत होती, परंतु आता मात्र रिंगरोड असो की कॉलनीरोड अथवा नियमित रस्ते सर्वच ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. मध्यंतरी महापालिकेने थोडा पाऊस उघडल्यानंतर काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नंतर ही कच बाहेर आली आणि तिचा वेगळाच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.नव्या रस्त्यांचा घाट४महापालिकेने एकदा रस्ते तयार केले की तीन वर्षे ठेकेदाराचे दायित्व असते. त्यानंतर महापालिकेकडे दायित्व येते. मात्र रस्ता एकदा तयार केल्यानंतर या पाच वर्षे झाले, दहा वर्षे झाले, परंतु अस्तरीकरण झालेले नाही असे सांगून महापालिकेच्या वतीने आता नवीन रस्ते झाले पाहिजे यासाठीच आग्रह धरला जातो. मात्र हे काम करण्यासाठी निधी नसल्याने पुन्हा तीच ती कारणे सांगितली जातात.खड्डे भरण्याचे कामही निकृष्टचखड्डे भरण्यासाठी रोड मॅन्यूअलमध्ये ते कसे भरावेत याची कार्यपद्धती दिली आहे. खड्ड्याला चौकोन करून घेऊन मग त्याची भरावे लागण्याची तरतूद आहे. परंतु प्रत्यक्षात कोणीच याबाबत बघत नाही. ठेकेदार आणि त्यांची माणसे खड्डे भरण्याचे काम कसे करतात आहे हे बघण्यासाठी मनपाचे कर्मचारीच उपलब्ध नसतातमोजकेच रस्ते सुस्थितीत४शहरातील एमजीरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड असे मोजकेच रस्ते सध्या सुस्थितीत असून, बाकी मात्र रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची भयंकर अवस्था झाली असून, हा ग्रामीण भागातील रस्ता वाटतो. शहरात असे अनेक रस्ते उखडले आहेत.मटेरियलच संपले !महापालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या आधीच खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याच्या साहित्य पुरवठ्याचा ठेका दिला जातो. परंतु मध्यंतरी साहित्यच संपल्याने मोठी अडचण निर्माण झाली. त्यानंतर कसे तरी साहित्य उपलब्ध करून कामकाज करण्यात येत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी जाताना त्या घसरत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका