शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘फडणीस’ संचालकांवर दोन गुन्हे दाखल ११ लाख ९२ हजारांच्या गुंतवणुकीचा अपहार

By admin | Updated: March 23, 2017 21:19 IST

जासह गुंतविलेली रक्कम परत दिली नसल्याने फौजदारी कायद्यान्वये न्यायालयाच्या आदेशाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांवर दोन गुन्हे

नाशिक : ठेवींवर जादा दराचे आमिष दाखवून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेत कालावधी पूर्ण होऊनही व्याजासह गुंतविलेली रक्कम परत दिली नसल्याने फौजदारी कायद्यान्वये न्यायालयाच्या आदेशाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा न्यायालयात अर्जदार शशांक बाळकृ ष्ण कुलकर्णी, सीमा शशांक कुलकर्णी यांनी फौजदारी अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्याने पोलिसांनी फडणीस संचालकांवर फिर्यादींच्या तक्रारीनुसार व न्यायालयीन आदेशानुसार गुन्हे दाखल केले आहेत. फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा अध्यक्ष संशयित विनय प्रभाकर फडणीस यासह संचालक भाग्यश्री सचिन गुरव, शरयू विनायक ठाकर, सायली विनय फडणीस, अनुराधा विनय फडणीस (सर्व रा. कल्पवृक्ष, कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्यादींच्या राहत्या घरी निसर्ग, साईनगर, दिंडोरीरोड येथे विश्वास संपादन करून जादा व्याजदराचे आमिष दाखवत प्रत्येकी अनुक्रमे ४ लाख ९२ हजार ४४४ व ७ लाख ३ हजार ४९१ रुपयांची रक्कम ठेव म्हणून २०१३ साली गुंतविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ठेवींची मुदत पूर्ण होऊनदेखील संबंधितांनी व्याजासह रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हांडोरे करीत आहेत.