शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण साहित्याने व्यापलेले व्यक्तिमत्त्व : भावे

By admin | Updated: October 23, 2016 00:17 IST

सार्वजनिक वाचनालय : नूतन कोनशिलेचे अनावरण

नाशिक : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांचे जीवन म्हणजे साहित्य भरलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांचे संपूर्ण जीवनच साहित्याने व्यापलेले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सात साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, तर पाच साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. त्यांनी २० पुस्तके लिहिली; मात्र एकदाही ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नसल्याची भावे यांनी खंत व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या भिंतीवर नूतन कोनशिलेचे अनावरणप्रसंगी ‘यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यिक योगदान’ विषयावर बोलताना ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास देशमुख, उपाध्यक्ष नरेश महाजन, प्रभारी कार्यवाह अ‍ॅड. अभिजित बगदे, देवदत्त जोशी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना भावे यांनी यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’, ‘युगांतर’, ‘सह्याद्रीचे वारे’ आदि पुस्तकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या सर्व साहित्य संमेलन अध्यक्षांच्या तोडीची साहित्य निमिर्ती केली आहे; मात्र येथील साहित्य परंपरेतील सारस्वतांना एकदाही यशवंतराव चव्हाण यांना संमेलन अध्यक्षपदी बसविण्याची कल्पना सूचली नसल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सहकार, औद्योगिक विकासासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकासालाही त्यांनी चालना दिली. त्यांनी सहकाऱ्यांसोबत विरोधकांनाही सन्मान दिला; मात्र त्यांची ही राजकीय आणि सामाजिक मूल्ये आजमितीला हरवली असून, आजच्या समाजाने सामाजिक आणि राजकीय नेतृत्व गमावले असल्याची टीका त्यांनी सध्याच्या राजकारण्यांवर केली. यावेळी औरंगाबादकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक तर, देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)