शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शहरात मतांचा टक्का वाढला

By admin | Updated: February 22, 2017 01:36 IST

मतदार जागृतीचा परिणाम : नवमतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदानाचा उत्साह; सर्वत्र प्रतिसाद

नाशिक : मतदार याद्यांमध्ये गोंधळाची स्थिती असतानाही यंदा महापालिका निवडणुकीसाठी ६१ टक्के मतदान झाले. सुमारे ७० हजारांहून अधिक नवमतदारांची झालेली नोंदणी, मतदार जागृतीसाठी राबविण्यात आलेले  विविध उपक्रम यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत चार टक्क्यांनी वाढ झाली. मतदारांमध्ये मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. कुठेही हिंसक वा अनुचित प्रकाराची  घटना न घडता शांततेत मतदानप्रक्रिया पार पडल्याने महापालिकेसह पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.  महापालिका निवडणुकीत २२ राजकीय पक्षांचे ८२१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविताना एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे होते. त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता होती. प्रभाग १५ आणि प्रभाग १९ मध्ये तीन सदस्य वगळता उर्वरित २९ प्रभागांमध्ये चार सदस्यांची रचना आहे. मतदानाप्रसंगी ज्या प्रभागांमध्ये कमी संख्येने उमेदवार होते त्याठिकाणी दोन ते तीन तर जास्त उमेदवार संख्या असलेल्या प्रभागात चार मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, मतदान करताना अनेकांचा गोंधळ उडाल्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना मतदारांच्या प्रबोधनाची भूमिका घ्यावी लागली. दरम्यान, शहरात २७९ संवेदनशील व ८८ क्रिटीकल केंद्रे निश्चित करण्यात आली होती. याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने किरकोळ तणाव व वादविवादाचे प्रसंग वगळता अनुचित घटना घडली नाही. पंचवटीतील हिरावाडी येथील शाळा क्रमांक ५५ मध्ये बाहेर जमा झालेली गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सिडकोतील प्रभाग २८ मध्ये भाजपा-सेना कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्यानंतर तणाव निवळला. उत्तमनगर येथील जनता विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर मतदारांना घेऊन येणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले, तर नाशिकरोड येथील प्रभाग २२ मध्ये बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. जुन्या नाशिकमधील रंगारवाडा या शाळेतील मतदान केंद्राजवळील बूथ २०० मीटरच्या आत असल्याने पोलिसांनी ते अन्यत्र हलविल्याने उमेदवार समर्थक व पोलीस यांच्यात किरकोळ वादविवादाचा प्रसंग घडला.