कारच्या धडकेने पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 22:46 IST2020-06-29T22:42:37+5:302020-06-29T22:46:52+5:30
सिन्नर : कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मोहन जगन्नाथ गुंजाळ यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

कारच्या धडकेने पादचारी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मोहन जगन्नाथ गुंजाळ यांचे उपचारादरम्यान निधन झाले. दोन दिवसांपूर्वी गुंजाळ हे शिर्डी महामार्गावरून पायी जात असताना वॅगन आर कारने त्यांना मागून जोराची धडक दिली होती. त्यांना जखमी अवस्थेत शिर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. वावी पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक-शिर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ होतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवस लॉकडाऊनमुळे वाहतुक बंद असल्याने अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती. मात्र वाहतुक सुरळित झाल्याने अपघात वाढले आहेत.