शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पवार स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड

By admin | Updated: October 29, 2016 00:17 IST

रायफल, पिस्तूल शूटिंग स्पर्धा : राज्य पातळीवरील स्पर्धेत दहा राज्यातील स्पर्धकांचा सहभाग

कळवण : मानूर येथील शरद पवार पब्लिक स्कूल येथे गेले दोन दिवस झालेल्या सीबीएसई बोर्डाच्या साऊथ झोन रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, केरळ, पॉण्डेचेरी, अंदमान निकोबार व लक्षद्वीप या विविध राज्यांतील शाळांचे रायफल व पिस्तूल शुटर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील विजयी खेळाडंूची वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यात शरद पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.शरद पवार पब्लिक स्कूल येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या साऊथ झोन एअर रायफल व पिस्तूल नेमबाजी (शूटिंग) स्पर्धेत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत शरद पवार पब्लिक स्कूलचे १४ ते १९ वर्षे वर्षाखालील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांची वाराणसी येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .शरद पवार पब्लिक स्कूलचा आदित्य पाटील या विद्यार्थ्याने १४ वर्षाखालील वयोगटात एअर पिस्तूल या खेळ प्रकारात द्वितीय व प्रतीक भामरे याने तृतीय स्थान प्राप्त केले. १९ वर्षाखालील वयोगटात एअर पिस्तूल या खेळ प्रकारात प्रसाद अहेर याने प्रथम स्थान प्राप्त केले. १९ वर्षांखालील वयोगटात पीप साईट एअर रायफल खेळ प्रकारात अक्षय पवार प्रथम व ओम कदम याने तृतीय स्थान प्राप्त केले. १७ वर्षाखालील एअर पिस्तूल वुमेन खेळ प्रकारात गौरी कामत (महाराष्ट्र) प्रथम, केतकी गोरे (महाराष्ट्र) द्वितीय व कस्तुरी गोरे (महाराष्ट्र) हिने तृतीय स्थान प्राप्त केले. १९ वर्षाखालील एअर पिस्तूल खेळ प्रकारात गुरू सिम्रण सिंग (कर्नाटक), द्वितीय व कु. भास्कर नाईन(केरळ) तृतीय स्थान प्राप्त केले. पीप साईट एअर रायफल मेन या खेळ प्रकारात डी. नेमिष (आंध्र प्रदेश) द्वितीय व पीप साईट एअर रायफल वुमेन, श्रुती देसिकन (केरळ) हिने प्रथम, प्रिया यादव (केरळ) द्वितीय व अनिकह अमिरीन (तामिळनाडू) स्थान प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्याथ्यांचा गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार, सप्तशृंगी महिला बँकेच्या अध्यक्ष मीनाक्षी पवार, शैलेश पवार, अनुप पवार, विलास शिरोरे, गजानन सोनजे, बी. एन. शिंदे, जे. एल. पटेल, समन्वयक विश्वेशरण आदिंनी सत्कार केला. (वार्ताहर)